घरताज्या घडामोडीDussehra 2021 : दसऱ्यानिमित्त माथेरानच्या अश्वपालकांचा उत्साह शिगेला, मिरवणूकीत सजवले घोडे

Dussehra 2021 : दसऱ्यानिमित्त माथेरानच्या अश्वपालकांचा उत्साह शिगेला, मिरवणूकीत सजवले घोडे

Subscribe

घोड्यांची मिरवणूक पूर्ण माथेरानमध्ये पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार करतात.

दसरा या सणाला हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दसरा सणाच्या विविध प्रचलित कथा आहेत. साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त मानल्या गेलेल्या विजयादशमीला शुभ कार्ये करतात. नवी वाहने, वास्तू तसेच कपड्यांची खरेदी,सोन्याची खरेदी होते. त्यानंतर योद्ध्यांनी शस्त्र पूजन, व्यापाऱ्यांनी व्यापारासाठी प्रयाण आणि विद्यार्थ्यांनी सरस्वतीपूजन करायचे अशी प्रथा आहे. प्रत्येकजण आपल्या वस्तू, वास्तू आणि वाहने यांचे पूजन करतात. मात्र माथेरानमध्ये दसऱ्यामध्ये घोड्यांचे पूजन केले जाते. माथेरानमध्ये वाहनांना बंदी असल्याने येथील प्रमुख वाहन घोडा असून, येथील लोकांचे उदरनिर्वाहाचे साधन म्हणून घोड्याला विशेष महत्व दिले जाते. त्यामुळे येथील अश्वचालक दसऱ्याच्या दिवशी घोड्याची विधिवत पूजा करून घोड्याला सजवून घोड्यांची मिरवणूक पूर्ण माथेरानमध्ये पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार करतात.
दसऱ्याच्या दिवशी दुपारी दोन वाजल्यापासून घोड्यांच्या तबेल्यात प्रत्येक घोडेमालकाचा परिवार परंपरेनुसार घोड्याच्या खुराची विधिवत पूजा करून घोड्याला वेगवेगळ्या प्रकारे सजवतात.घोड्याच्या मानेच्या केसाला रिबिनीने सजवून,विविध फुलांचे हार फुलांनी घोड्याच्या पायाला गळ्याला सजवून,घोड्यावर काही घोडेवाल्यांनी झुल टाकून,झुलीला फुगे बांधून घोड्याला आकर्षक सजवून तबेल्यातून ढोल ताश्याच्या गजरात मिरवणूक काढून सर्व घोडे मिरवणुकीत सामिल होऊन श्री. रामचौक येथे घोड्यांचा नृत्य अविष्कार सादर करण्यात आला. तर फीटनेस आणि चांगले नृत्य सादर करणाऱ्या घोडे मालकांना संघटनेच्या वतीने पारीतोषिक देऊन गौरविले जाते. परंपरागत या दसऱ्याच्या उत्सवापासून घोडे व्यवसायिक आपल्या आर्थिक वर्षांची सुरुवात करत असतात.
                                                                                         वार्ताहर : दिनेश सुतार

हे ही वाचा – Marigold farming : मानगावातील स्वावलंबी तरुणाने केली यशस्वी झेंडूची शेती


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -