घरक्रीडाKKR vs CSK Final: कोकाता-चेन्नईमध्ये अंतिम सामन्यात भिडणार, धोनी चौथ्या जेतेपदासाठी प्रयत्नांची...

KKR vs CSK Final: कोकाता-चेन्नईमध्ये अंतिम सामन्यात भिडणार, धोनी चौथ्या जेतेपदासाठी प्रयत्नांची शिकस्त करणार

Subscribe

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपरकिंग्ज आणि ओएन मॉर्गनची कोलकाता नाइट रायडर्समध्ये आयपीएल २०२१ चौदाव्या हंगामातील अंतिम सामना होणार आहे. यापुर्वी चेन्नई आणि कोलकाता २०१२ मध्ये अंतिम फेरित आमने-सामने आली होती. यंदा मुंबईला अंतिम सामन्याच्या लढतीमधून बाहेर झाली आहे. कोलकाता-चेन्नईमध्ये आज दुबईतील स्टेडियमवर सामना रंगणार आहे. यामध्ये जेतेपद कोण पटकवणार याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. मागील वर्षीची चेन्नईची कामगिरी निराशाजनक होती परंतु यंदाच्या मोसमात चेन्नईने अभूतपुर्व कामगिरी केली असून अंतिम सामन्यात धडक दिली आहे.

चेन्नई सुपर किंग्जने आतापर्यंत तीन वेळा आयपीएलमध्ये जेतेपद पटकावले आहे. तर मॉर्गनच्या कोलकाता नाईट रायडर्सला तिसऱ्यांदा चॅम्पियन व्हायचे आहे. धोनीच्या नेतृत्वत चेन्नई आतापर्यंत तब्बल ९ वेळा आयपीएलच्या अंतिम फेरित पोहचली आहे परंतु केवळ ३ वेळा अंतिम चषकावर आपलं नाव कोरण्यात यशस्वी झाली आहे. यंदा चौथ्या वेळी जेतेपद पटकवण्याची संधी आहे. तर कोलकाता नाइट रायडर्स तिसऱ्या विजयासाठी लढेल. कोलकाताची अंतिम फेरित धडक देण्याची ही तिसरीच वेळ असून यावेळी कोलकाता अंतिम सामन्यात विजयी होईल का? असा सवाल उपस्थित होत आहे.

- Advertisement -

सीएसके जिंकणार असल्याचा खेळाडूचा दावा

चेन्नई सुपर किंग्ज यंदाच्या अंतिम सामन्यात जिंकणार असल्याची भविष्यवाणी आरसीबीचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेन याने केली आहे. डेल स्टेन याने म्हटलं आहे की, यंदाचा चेन्नई आणि कोलकाताचा सामना जुगारासारखाच होणार आहे. कोलकाताला चुकीच्या निर्णयाचा फटका बसणार आहे. दिनेश कार्तिक आऊट ऑफ फॉर्म असल्याचा फटका केकेआरला बसणार आहे. मागील सामन्यात असेच झाले होते असे डेल स्टेन याने म्हटलं आहे.


हेही वाचा : IPL 2021 : ऋषभ पंतने ‘या’ चुका टाळल्या तर IPL ट्रॉफी दिल्लीकडे – गावस्कर

- Advertisement -

 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -