Sunday, May 9, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी मध्य रेल्वेच्या अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्यांच्या धावण्याचा कालावधीचा विस्तार

मध्य रेल्वेच्या अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्यांच्या धावण्याचा कालावधीचा विस्तार

मध्य रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी विशेष शुल्कासह एक संपूर्ण आरक्षित असणारी विशेष ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

Related Story

- Advertisement -

मध्य रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी विशेष शुल्कासह एक संपूर्ण आरक्षित असणारी विशेष ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई आणि गोरखपूर दरम्यान अतिरिक्त उन्हाळी विशेष ट्रेन

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोरखपूर ०१२३७ विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दि. २४ एप्रिल २०२१ रोजी १४.३० वाजता सुटेल व गोरखपूर येथे तिसर्‍या दिवशी ०२.३० वाजता पोहोचेल. ०१२३८ विशेष गोरखपूर येथून दि. २६ एप्रिल २०२१ रोजी ०५.०० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसर्‍या दिवशी १६.३० वाजता पोहोचेल. दादर, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, बांदा जंक्शन, कानपूर सेंट्रल, लखनऊ, गोंडा, बस्ती. या स्थानकांवर थांबवण्यात येतील. तसेच १ द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, ४ शयनयान, ५ द्वितीय आसन श्रेणी. अशी संरचना असेल. पूर्णपणे आरक्षित ०१२३७ विशेष गाडीचे विशेष शुल्कासह बुकिंग दि. २४ एप्रिल २०२१ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.

मुंबई – रक्सौल आणि पुणे – दानापूर/भागलपूर दरम्यान अतिरिक्त ग्रीष्मकालीन विशेष रेल्वे

- Advertisement -

लोकमान्य टिळक टर्मिनस – रक्सौल विशेष
०१२३५ विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दि. २७ एप्रिल २०२१ रोजी २१.१५ वाजता सुटेल आणि रक्सौल येथे तिसर्‍या दिवशी २३.४५ वाजता पोहोचेल. १२३६ विशेष रक्सौल येथून दि. ३० एप्रिल २०२१ रोजी १४.०० वाजता सुटेल व लोकमान्य टिळक टर्मिनस येथे तिसर्‍या दिवशी १७.०० वाजता पोहोचेल. ठाणे, भिवंडी रोड, वसई रोड, सूरत, वडोदरा, रतलाम, कोटा, सवाई माधोपूर, बयाना, आग्रा फोर्ट, टुण्डला जंक्शन, कानपूर सेंट्रल, ऐशबाग, गोंडा, बस्ती, गोरखपूर, पनिहवा, नरकटियागंज जंक्शन, बेतिया या स्थानकांवर थांबवण्यात येतील व २१ द्वितीय आसन श्रेणी. अशी संरचना असेल.

पुणे-दानापूर विशेष अतिजलद
०१४७१ विशेष पुणे येथून दि. २७ एप्रिल २०२१ रोजी १७.४० ​​वाजता सुटेल व दानापूर येथे तिसर्‍या दिवशी ००.४० वाजता पोहोचेल. ०१४७२ विशेष दानापूर येथून दि. २९.४.२०२१ रोजी ०५.०० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसर्‍या दिवशी ११.३५ वाजता पोहोचेल. दौंड कॉर्डलाइन, अहमदनगर, मनमाड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, प्रयागराज छिवकी, पं. दीन दयाल उपाध्याय जं. या स्थानकांवर थांबवण्यात येतील. व १ द्वितीय वातानुकूलित, ३ तृतीय वातानुकूलित, १३ शयनयान, ५ द्वितीय आसन श्रेणी. अशी संरचना असेल.

- Advertisement -

पुणे-भागलपूर विशेष
०१४६९ विशेष पुणे येथून दि. २८.४.२०२१ रोजी ०६.१० वाजता सुटेल आणि भागलपूर येथे दुसर्‍या दिवशी १८.४० वाजता पोहोचेल. ०१४७० विशेष भागलपूर येथून दि. २९.४.२०२१ रोजी २२.०० वाजता सुटेल व पुणे येथे तिसर्‍या दिवशी ११.३५ वाजता पोहोचेल. दौंड कॉर्डलाइन, अहमदनगर, मनमाड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, प्रयागराज छिवकी, पं. दीन दयाल उपाध्याय जं., सासाराम, गया जं., किउल, जमालपूर. या स्थानकांवर थांबवण्यात येतील. व ७ शयनयान, ११ द्वितीय आसन श्रेणी. अशी संरचना असेल. पूर्णतः आरक्षित -१२३५, ०१४७१ आणि ०१४६९ या विशेष गाडयांचे विशेष शुल्कासह बुकिंग 25 एप्रिल 2021 रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.

या विशेष गाडयांच्या थांब्यांच्या तपशीलासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अ‍ॅप डाउनलोड करा. केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल. प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९ शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.
- Advertisement -