Friday, April 9, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी रश्मी ठाकरे यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज 

रश्मी ठाकरे यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज 

३० मार्चला त्यांना रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना सोमवारी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. रश्मी ठाकरे यांना २३ मार्चला कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर त्यांनी स्वतःला घरीच क्वारंटाईन केले होते. परंतु, ३० मार्चला त्यांना रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, काळजीचे कारण नसून त्यांना रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. आता त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या असून त्यांना सोमवारी डिस्चार्ज मिळाला आहे. त्या आता वर्षा या निवासस्थानी परतल्या आहेत.

लस घेतल्यानंतर काही दिवसांत कोरोना

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ११ मार्चला सपत्नीक रुग्णालयात जाऊन कोरोनाची लस घेतली होती. मात्र, लस घेतल्याच्या अवघ्या १२ दिवसांत रश्मी ठाकरेंना कोरोनाची लागण झाली आहे. २३ मार्चला रश्मी ठाकरेंचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्याआधी दोन दिवसांपूर्वी त्यांचे सुपुत्र आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनाही कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर रश्मी ठाकरे या वर्षा बंगल्यावर होम क्वारंटाईनमध्ये होत्या. परंतु, त्यानंतर ३० मार्चला त्यांना रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

- Advertisement -