घरताज्या घडामोडीनाशिक: कोरोनाने घेतला आईचा बळी, तर लेकीची सॅनिटाझरची पिऊन आत्महत्या

नाशिक: कोरोनाने घेतला आईचा बळी, तर लेकीची सॅनिटाझरची पिऊन आत्महत्या

Subscribe

पुढ्यात असलेले सॅनिटायझर पिऊन मुलीनेही मृत आईच्या पुढ्यात आत्महत्या करुन आपले आयुष्य संपवले

राज्याला बसलेला कोरोनाचा फटका फार मोठे नुकसान करत आहे. यात अनेक जणांचा जीव जात आहे. तर अनेकांनी आपली जिवभावाची माणसे गमावली आहेत. राज्यातील ऑक्सिजन बेड अभावी मृत्यू झाल्याच्या अनेक धक्कादायक घटना आपण ऐकत आहोत. अशीच एक घटना नाशिकमधून समोर येत आहे. कोरोनाने नकळत दोन जणांचे बळी घेतले. कोरोनाची लागण झाल्याने आईला रुग्णालयात दाखल करण्यात आले. ऑक्सिजन आणि बेड अभावी आईचा दुर्देवी मृत्यू झाला. आईच्या मृत्यूमुळे स्वत:ला सावरु न शकल्याने मुलीनेही आपले जीवन संपवले. पुढ्यात असलेले सॅनिटायझर पिऊन मुलीनेही मृत आईच्या पुढ्यात आत्महत्या करुन आपले आयुष्य संपवले. या घटनेमुळे नाशिकमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

जया भुजबळ असे मृत महिलेचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली. त्या उपचारांसाठी नाशिक रुग्णालयात दाखल झाल्या. मात्र त्यांना ऑक्सिजन बेड न मिळाल्याने त्यांना दुर्दैवाने प्रमाण गमवावे लागले. त्यांची मुलगी शिवानी भुजबळ ही त्यांच्या सोबत होती. आईचा ऑक्सिजनअभावी आपल्या पुढ्यात झालेल्या मृत्यूने शिवानी भांबावून गेली. आईच्या जाण्याचे दु:ख सहन करु शकल्याने शिवानी आपले जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. सॅनिटायझर पिऊन शिवानीने आत्महत्या केली. आई पाठोपाठ मुलगीसुद्धा हे जग सोडून गेल्याने भुजवळ कुटुंबार दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

- Advertisement -

नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. नाशिक शहराचा पॉझिटिव्हीटी रेट हा ४० वरुन थेट १७ वर आला आहे. गेल्या २४ तासात नाशिकमध्ये ६ हजारांहून अधिक रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. काही दिवसांपूर्वीच नाशिकच्या रुग्णालयात झालेल्या ऑक्सिजन गळतीमुळे संपूर्ण नाशिक हादरले होते


हेही वाचा – राज्यात ४ कोटी नागरिकांनी घेतला शिवभोजन थाळीचा आस्वाद

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -