घरमनोरंजनकंगनाची KOO एपवर एन्ट्री, म्हणाली 'भाड्याचे घर हे भाड्याचंच असतं'...

कंगनाची KOO एपवर एन्ट्री, म्हणाली ‘भाड्याचे घर हे भाड्याचंच असतं’…

Subscribe

कू अॅपच्या बायोमध्ये कंगनाने स्वत:ला खरी देशभक्त आणि हॉट ब्लेडेडड क्षत्रिय महिला असं म्हटले आहे.

बॉलिवूडची पंगा गर्ल कंगना रणौतच्या ट्विटरला मंगळवारी कायमस्वरुपी बंदी घालण्यात आली होती. कंगना नेहमीच सोशल मीडियावर बेधडकपणे आपली मते मांडत असते, परंतु कंगनाची ही शैली ट्विटरला आवडलेली नाही. तिने ट्विटरद्वारे केलेल्या देशयुक्त विधानामुळे तिचे ट्विटर अकाऊंट निलंबित करणात आले होते. मात्र ट्विटरच्या या कारवाईनंतर कंगनाच्या समर्थनात कू अॅप पुढे आले आहे. कंगनाचे ट्विटर अकाऊंट बॅन झाल्यानंतर कंगनाचे चाहते निराश झाले होते. पण आता चिंता नाही. ट्विटरने जरी हकालपट्टी केली असली तरी कू अॅपने मात्र कंगनाचे स्वागत केले आहे. त्यामुळे आता कंगना ट्विटरऐवजी कू अॅपवर तिची प्रखर मतं व्यक्त करताना दिसू शकते. कंगनाने याबाबत माहिती देणारी एक पोस्ट सोशल मीडियाद्वारे शेअर केली आहे. कू अॅपच्या बायोमध्ये कंगनाने स्वत:ला खरी देशभक्त आणि हॉट ब्लेडेडड क्षत्रिय महिला असं म्हटले आहे. कंगनाने फेब्रुवारीमध्ये कू वर एन्ट्री घेत पहिली पोस्ट शेअर केली होती. इतकंच नव्हे तर भाड्याचं घर हे भाड्याचंच असतं अशी अप्रत्यक्षपणे ट्विटरवर टीकाही केली होती.

 

- Advertisement -

 

- Advertisement -

कूचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अप्रमेय राधाकृष्ण यांनी मंगळवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन कंगनाच्या पहिल्या कू पोस्टचा स्क्रीनशॉट शेअर केला, ज्यात तिने ‘कु आप घर है’ असं म्हटलं आहे. अश्या परिस्थितीत हे पोस्ट करुन अप्रमेयने अभिनेत्रीला ‘बरोबर’ असे म्हणत दुजोरा दिला आहे. आणि पुढे म्हटले की, ‘कू तिच्या घरासारखे आहे, तर बाकीची भाड्याने घेण्यासारखे आहेत’.कूच्या या स्वागतामुळे कंगनाचे चाहते खूप खुश झाले आहेत. कंगना ट्विटरप्रमाणेच कू वरही खूप अ‍ॅक्टिव आहे. कू लाँच झाल्यानंतर लगेचच अभिनेत्री यात सामील झाली. या प्लॅटफॉर्मवर कंगनाचे अधिकृत पेज आहे आणि त्यावर तिचे 449K फॉलोअर्स आहेत.


हे वाचा-  ‘दृश्यम 2’ चित्रपटाच्या घोषनेनंतर निर्मात्यांमध्ये अधिकृत हक्कावरुन झाला वाद

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -