Mumbai Cruise Drugs Case : आर्यनसह ५ जणांना उद्या न्यायालयात हजर करणार, न्यायालयीन कोठडीची शक्यता?

सोमवारी उर्वरित ५ जणांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Mumbai Cruise Drugs Case NCb again aryan khan and 5 others produced before court
Mumbai Cruise Drugs Case : आर्यनसह ५ जणांना उद्या न्यायालयात हजर करणार, न्यायालय कोठडीची शक्यता?

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला एका हायप्रोफाईल ड्रग्ज पार्टीमध्ये एनसीबीने अटक केली आहे. मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझमध्ये सुरु असलेल्या पार्टीमध्ये आर्यन खानसह ८ जणांना अटक करण्यात आलं आहे. आर्यन खान आणि इतर दोघांना एक रात्रीची एनसीबी कोठडी सुनावली आहे. आर्यन खानला उद्या म्हणजेच सोमवारी पुन्हा कोर्टात हजर करण्यात येणार आहे. तसचे आणखी ५ जणांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे. आर्यन खानला सोमवारी न्यायालयीन कोठडी सुनावण्याची आणि जामीन मिळण्याची शक्यता आहे. आर्यनला रविवारी ७ वाजता किला कोर्टात हजर करण्यात आले होते. एनसीबीने दोन दिवसांची कोठडी मागितली होती परंतु न्यायालयाने १ दिवसाची कोठडी दिली आहे.

आर्यन खान, मुनमुन धामेचा आणि अरबाज मर्चंट यांना एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात अटक केली असून किला कोर्टात हजर केले होते. कोर्टाने एक दिवसीय एनसीबी कोठडी दिली आहे. एनसीबीने दिलेल्या माहितीनुसार उद्या सोमवारी उर्वरित ५ जणांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. नूपुर सतिजा,इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, गोमित चोप्रा, आणि विक्रांत चॉकर असे अटक करण्यात आलेल्या पाच जणांची नावे आहे. या पाचही जणांना उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आर्यन खान आणि इतर दोघे असे तिघांना आज सायंकाळी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने दोन्ही आरोपी आणि एनसीबीची बाजू एकूण तिघांना एक दिवसाची एनसीबी कोठडी सुनावली आहे. सोमवारी शाहरुख खान याचा मुलगा आर्यन आणि इतर दोघे यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार असून तिघांना न्यायालयीन कोठडी होण्याची शक्यता असून तिघांना जामीन देखील मिळू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

समीर वानखेडे काय म्हणाले ?

मुंबई एनसीबीचे डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात ही धडक कारवाई करण्यात आली आहे. समीन वानखेडे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी म्हटलं आहे की, आर्यन खानसह तीघांना कोर्टात हजर केले होते. त्यांना न्यायालयाने १ दिवस एनसीबीची कोठडी दिली आहे. उद्या उर्वरित ५ जणांना हजर करण्यात येणार आहे. पाच जणांना संशयित म्हणून अटक करण्यात आले आहे. एनसीबीला मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात अनेक प्रकारचे ड्रग्ज सापडले आहेत. पुढेही कारवाई सुरुच असून महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता असल्याचे समीन वानखेडे यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : Mumbai Cruise Drugs Case : शाहरुखच्या मुलाला १ दिवसाची एनसीबी कोठडी