Punjab Election 2022 : सोनू सूद विरोधात FIR दाखल, मतदानादिवशी बहिणीसाठी प्रचार केल्याचा आरोप

निवडणूक आचार संहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी अकाली दलाच्या कार्यकर्त्यांनी सोनू सूद विरोधात तक्रार दाखल केली होती. यावेळी निवडणूक आयोगाकडून सोनू सूदची कार जप्त करुन घरी पाठवण्यात आले होते.

Punjab Election 2022 FIR filed against Sonu Sood disobeying directives visiting poll booth moga
Punjab Election 2022 : सोनू सूद विरोधात FIR दाखल, मतदानादिवशी बहिणीसाठी प्रचार केल्याचा आरोप

Punjab Election 2022 : अभिनेता सोनू सूदच्या अडचणीत वाढ झाली आहे. सोनू सूद विरोधात पंजाबमध्ये मोगा मतदार संघात निवडणूक आचार संहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी FIR दाखल करण्यात आली आहे. पंजाबमध्ये २० फेब्रुवारी रोजी पंजाबमध्ये तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. त्यावेळी सोनू सूद त्याची कार घेऊन मतदान केंद्रावर पोहोचला होता. निवडणूक आचार संहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी अकाली दलाच्या कार्यकर्त्यांनी सोनू सूद विरोधात तक्रार दाखल केली होती. यावेळी निवडणूक आयोगाकडून सोनू सूदची कार जप्त करुन घरी पाठवण्यात आले होते.

अभिनेता सोनू सूद बहिण मालविका सूद हिच्या मोगा मतदार संघातून निवडणूकीच्या रिंगणात उतरली आहे. पंजाबमध्ये १८ फेब्रुवारीला निवडणूक प्रचार संपल्यानंतर बाहेरील लोकांना विधानसभा क्षेत्र सोडण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र तरीही मतदानादिवशी सोनू सूदने मतदान केंद्रात घुसण्याचा प्रयत्न केला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, मोगा पोलिसांनी सोनू सूद विरोधात निवडणूक आयोगासोबत बोलून आयपीसी कलम १८८अंतर्गत FIR नोंदवली आली. पंजाब विधानसभा निवडणूकीसाठी आचार संहिते संदर्भात जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विरोधक अकाली दलाच्या काही लोकांकडून विविध मतदान केंद्रावर धमकीचे फोन आल्याची माहिती आम्हाला मिळाली. काही मतदान केंद्रांवर पैसे वाटत जात आहेत, असे देखील कळाले. त्यामुळे निष्पक्ष निवडणूका होत आहेत की नाही हे पाहणे आमचे कर्तव्य आहे आणि ते पार पाडण्यासाठी आम्ही तिथे गेले होतो. पण त्यांच्या कारवाईनंतर आम्ही घरी आलो आहोत. निष्पक्ष निवडणूका व्हाव्यात हीच आम्ची इच्छा आहे असे स्पष्टीकरण सोनू सूदने दिले होते.


हेही वाचा –  Panjab Election 2022 : सोनू सूदची कार जप्त, निवडणूक आयोगाने मतदान केंद्रावर जाण्यापासूनही रोखले