घरAssembly Battle 2022Panjab Election 2022 : सोनू सूदची कार जप्त, निवडणूक आयोगाने मतदान...

Panjab Election 2022 : सोनू सूदची कार जप्त, निवडणूक आयोगाने मतदान केंद्रावर जाण्यापासूनही रोखले

Subscribe

सोनू सूदची बहिण मालविका मोगा मतदार संघातून निवडणूक लढत आहे. मोगा जिल्ह्याचे पीआरओ प्रभदीप सिंह यांनी म्हटले आहे की, सोनू सूद मतदान केंद्राच्या आत जाण्याचा प्रयत्न करत होता.

Panjab Election 2022 :  आज देशातील पंजाबमध्ये तिसऱ्या टप्प्यांतील निवडणूका पार पडत आहेत. दरम्यान अकाली दलाने अभिनेता सोनू सूदला स्वत:चा बूथ सोडून दुसऱ्या बुथवर गेल्याची तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाकडून सोनू सूद विरोधात कारवाई करत त्याची कार जप्त करण्यात आली.  त्याचप्रमाणे त्याला मतदान केंद्रावर जाण्यापासून देखील रोखण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, सोनू सूदची कार जप्त केली आहे त्याचप्रमाणे एसडीएम अधिकारी सतवंत सिंह यांनी सोनू सूदच्या घराचे पाहणी करण्याचे देखील निर्देश दिले आहेत.

सोनू सूदची बहिण मालविका मोगा मतदार संघातून निवडणूक लढत आहे. मोगा जिल्ह्याचे पीआरओ प्रभदीप सिंह यांनी म्हटले आहे की, सोनू सूद मतदान केंद्राच्या आत जाण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी त्याची कार जप्त करुन त्याला घरी पाठवण्यात आले. तो घराबाहेर पडल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल.

- Advertisement -

या प्रकरणावर सोनू सूदने खुलासा केला, विरोधक अकाली दलाच्या काही लोकांकडून विविध मतदान केंद्रावर धमकीचे फोन आल्याची माहिती आम्हाला मिळाली. काही मतदान केंद्रांवर पैसे वाटत जात आहेत, असे देखील कळाले. त्यामुळे निष्पक्ष निवडणूका होत आहेत की नाही हे पाहणे आमचे कर्तव्य आहे आणि ते पार पाडण्यासाठी आम्ही तिथे गेले होतो. पण त्यांच्या कारवाईनंतर आम्ही घरी आलो आहोत. निष्पक्ष निवडणूका व्हाव्यात हीच आम्ची इच्छा आहे असे सोनू सूद म्हणाला.

पंजाबमध्ये ११७ जागांवर मतदान होत आहे. पंजाबमध्ये काँग्रेस, आप, अकाली दल आणि भाजप यांच्यात लढत पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशमध्ये देखील तिसऱ्या टप्प्यात ५९ जागांसाठी मतदान पार पडत आहे.

- Advertisement -

हेही वाचा –  Punjab Election 2022 Phase 3 Voting: पंजाबमध्ये १७.७७ आणि यूपीत २१.१८ टक्के…

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -