घरताज्या घडामोडीShattila Ekadashi 2022 : सुख - समृद्धीसाठी उद्याचा दिवस महत्वाचा, फक्त तिळाचा...

Shattila Ekadashi 2022 : सुख – समृद्धीसाठी उद्याचा दिवस महत्वाचा, फक्त तिळाचा करा असा उपयोग

Subscribe

या दिवशी तिळाचे दान केल्यास सुख समृद्धी प्राप्त होते. काय आहे षटतीला एकादशीचा मुहूर्त आणि या दिवशी तिळाचा कसा उपयोग करणे शुभ आहे जाणून घ्या.

माघ महिन्याच्या कृष्ण पक्ष एकादशीला षटतीला एकादशीचे ( Shattila Ekadashi 2022 ) व्रत केले जाते. तसे पहायला गेले तर एका महिन्यात दोन एकादशी येतात मात्र काही एकादशींना विशेष महत्त्व आहे. त्यातील षटतीला एकादशी एक आहे. यावर्षी 2 जानेवारी 2022, शुक्रवारी षटतीला एकादशी आली आहे. या दिवशी भगवान विष्णूची मनोभावे पूजा केली जाते. त्याचप्रमाणे या दिवशी तिळाचे दान केल्यास सुख समृद्धी प्राप्त होते. काय आहे षटतीला एकादशीचा मुहूर्त आणि या दिवशी तिळाचा कसा उपयोग करणे शुभ आहे जाणून घ्या.

शुभ मुहूर्त

षटतीला एकादशी 27 जानेवारी 2022

- Advertisement -

प्रारंभ – सकाळी 2:16 मिनिटांनी
समाप्ती – 28 जानेवारी 2022 रात्री 11:35 वाजता

शुभ मुहूर्त

- Advertisement -

28 जानेवारी

सकाळी 7:11 ते 9:20 वाजेपर्यंत

 

षटतीला एकादशीला करा तिळाचा असा 6 प्रकारचा उपयोग

  • षटतीला एकादशीला तिळाला फार महत्त्व आहे. धर्म शास्त्रानुसार, षटतीला एकादशी व्रतादिवशी सकाळी तिळाचे उटणे लावून स्नान करायला हवे.
  • आंधोळीच्या पाण्यातही तिळ टाकून स्नान केले जाते.
  • भगवान विष्णू यांच्या पूजेच्या प्रसादात तिळापासून बनवलेल्या मिठाईंचा नैवेद्य दाखवावा. तिळाचे पदार्थ खावेत.
  • भगवान श्री विष्णूंच्या पूजाअर्चेवेळी तिळाचा वापर करावा.
  • शक्य असल्यास तिळाच्या तेलाने शरिराची मॉलिश करा. यामुळे शरीर स्वास्थ निरोगी राहण्यास मदत होते.
  • षटतीला एकादशीला आठवणीने कोणत्याही वस्तूचे दान करावे. दान केल्याशिवाय हे व्रत पूर्ण होत नाही.

हेही वाचा – Astrology झोपण्याआधी करा ‘या’ मंत्रांचा जप , होईल भरभराट

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -