घरठाणेविद्यार्थ्यांसाठी "ठामपाची सायंकाळी" शाळा; गरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाचा स्तुत्य उपक्रम

विद्यार्थ्यांसाठी “ठामपाची सायंकाळी” शाळा; गरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाचा स्तुत्य उपक्रम

Subscribe

शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचा लिखाणाचा सराव मंदावला असून त्यांना लिखाणचा सराव रहावा यासाठी या विद्यार्थ्यांना नियमित सराव सुरू राहावा त्यासाठी पालिकेने एक पाऊल पुढे टाकले आहे.

कोरोना महामारी च्या काळात जास्तीत जास्त काम हे ऑनलाइन पद्धतीने केलं गेलं. अनेक व्यवहार देखील ऑनलाइन पद्धतीने केले गेले सरकारी यंत्रणांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात बदल झाला. त्यातच आता. महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने विध्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचे धडे दिले जात असून एकूण 28 हजार विद्यार्थी आहेत, मात्र त्यापैकी 16 हजार विद्यार्थी लाभ घेत असून उर्वरीत विद्यार्थ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नसल्याने वंचित राहत आहेत, हीच बाब लक्षात घेऊन अश्या विध्यार्थ्यांना ठाणे महापालिकेने संध्याकाळची शाळा भरवण्याचे ठरवले आहे. ज्या विद्यार्थीचे पालक संध्याकाळी घरी येतात त्यांच्याकडे मोबाईल आहेत, अश्याच विध्यार्थ्यांसाठी संध्याकाळी 7 ते 9 पर्यन्त शाळा घेतली जात आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षभर शाळा संपूर्णपणे बंद आहेत. महापालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होवू नये यासाठी ऑनलाईन शिक्षण मागील वर्षीपासूनच सुरू आहे. महापालिका शाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी हे आर्थिक दुर्बल घटकातील आहेत, या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाची आवड निर्माण व्हावी व ते शिक्षणापासून दूर जावू नयेत, कारण हेच विद्यार्थी भविष्यातील देशाचे आधारस्तंभ असल्याने ते शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी पालिकेच्या शिक्षण विभागाने या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन केले आहे.

- Advertisement -

महापालिका शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी हे गरीब आहेत, या विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची आवड असते त्यांनी ऑनलाईन माध्यमातून शिक्षण घ्यावे, तसेच शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचा लिखाणाचा सराव मंदावला असून त्यांना लिखाणचा सराव रहावा यासाठी या विद्यार्थ्यांना नियमित सराव सुरू राहावा त्यासाठी पालिकेने एक पाऊल पुढे टाकले आहे.

ठाणे महापालिका शाळेत शिक्षणापासून 10 ते 12 हजार विद्यार्थी वंचित आहेत. काही विद्यार्थी गरीब असून फक्त पालकांकडे मोबाईल आहेत. त्यामुळे पालक घरी आल्यानंतरच काही विद्यार्थी अभ्यासाला लागतात, जशी वेळ उपलब्ध होईल तसे विद्यार्थींना शिक्षणाचे धडे दिले जात आहेत.
– योगेश जानकर ( शिक्षण मंडळ सभापती )

- Advertisement -

ऑनलाईन शिक्षण पद्धत सध्या सुरू आहे, आपण त्या पद्धतीने शिक्षण विध्यार्थ्यांना देत असतो. जे पालक रोजगारासाठी बाहेर जातात, यावर तोडगा काढण्यासाठी पालक संध्याकाळी घरी परतल्यावर त्याच्या मोबाईल द्वारे ही पद्धत वापरली जात आहे..
– संदीप माळवी ( अतिरिक्त आयुक्त, ठाणे पालिका )


हेही वाचा – Covid-19 India: कोरोनाची दुसरी लाट संपलेली नाहीच; १८ जिल्ह्यांमध्ये कोरोना पुन्हा वेगाने वाढतोय

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -