Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी Live Update: चंद्रकांत पाटील उद्या घेणार राज ठाकरेंची भेट

Live Update: चंद्रकांत पाटील उद्या घेणार राज ठाकरेंची भेट

Subscribe

चंद्रकांत पाटील शुक्रवारी घेणार राज ठाकरेंची भेट, शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता कृष्णकुंजवर होणार भेट


लसींच्या तुटवट्यामुळे अदर पुनावाला घेणार आरोग्य मंत्र्यांची भेट


- Advertisement -

अनिल देशमुख प्रकरणी CBI ची राज्य सरकारविरोधात हायकोर्टात धाव


पैलवान रवि कुमारला ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक, रवि कुमारचा रशियाकडून पराभव


- Advertisement -

इस्त्राइल दौऱ्यासंदर्भातील चौकशी अहवाल ४ आठवड्यात सादर करा, मुंबई हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश


कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अभूतपूर्व पावसामुळे खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती


कर्नाटक सरकारचा आरटीपीसीआर करण्याबाबतचा निर्णय रद्द, शिवसेनेकडून निर्णयाचा निषेध करत आंदोलन करण्यात आले होते.


मुंबई लोकलबाबत पुढील सुनावणी १२ ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे. २ डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची परवानगी का नाही असा प्रश्न हायकोर्टाने राज्य सरकारला केला आहे.


मुंबई लोकलबाबत आज मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. हायकोर्टात सुनावणीला सुरुवात झाली आहे. राज्य सरकार आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. सर्व सामान्यांना लोकल प्रवासाची मुभा मिळणार आहे का? हे आज समजणार आहे


मुंबई महापालिकेच्या वांद्रे येथील एच वॉर्ड इमारतीचे उद्घाटन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बीएमसीच्या विभाग कार्यालयाच्या नव्या वास्तूचे लोकार्पण


पेगॅसस प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार, याचिकेत पेगॅसस मार्फत हेरगिरी करण्यात येत असल्याचे म्हटलं आहे.


कर्नाटकातील एका प्रकरणात ४ हजार कोटींचा घोटाळा झाला आहे. याबाबत मुंबई आणि बँगलोरमध्ये ईडी कारवाई करत आहे. मुंबईत सध्या ४ ठिकाणी ईडीने छापेमारी केली आहे.


कर्नाटक सीमेवरील आरटीपीसीआर चाचणीच्या निर्णयाविरोधात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटक सरकारविरोधात आंदोलन केलं आहे.


India Corona Update : देशात २४ तासात ४२ हजार ९८२ कोरोनाबाधितांची नोंद, ५३३ रुग्णांचा मृत्यू तर ४१ हजार ७२६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ही ३ करोड १८ लाख १२ हजार ११४ झाली आहे. तर सध्या ४ लाख ११ हजार ०७६ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत.


वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला अमित शहा यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट देण्याच निमंत्रण , केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सप्टेंबरमध्ये भेट देणार


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून भारतीय हॉकी संघाचं अभिनंदन

भारतीय पुरुष हॉकी संघानं संघर्षपूर्ण खेळत ऑलिंपिक कांस्यपदक जिंकल्याबद्दल संघातील खेळाडू, प्रशिक्षक व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन. 41 वर्षांची प्रतिक्षा, प्रयत्न, परीश्रमानंतर मिळालेल्या या यशाचा आनंद अवर्णनीय आहे. या पदकानं देशाचा गौरव वाढला असून भारतीय हॉकीच्या ‘सुवर्ण’युगाच्या दिशेनं ही नवी सुरुवात ठरेल.” अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी ऑलिंपिक कांस्यपदक विजेत्या भारतीय पुरुष संघाचं अभिनंदन केलं आहे.


भारतीय हॉकी संघाने इतिहास रचला आहे. १९८० नंतर भारतीय हॉकी संघाला पदक मिळालं आहे. जर्मनीविरुद्ध ५:४ अशी खेळी करत भारतीय संघाने विजय मिळवला आहे.


Tokyo Olympics 2020 भारताने जर्मनीवरुद्ध ५ गोल डागत घेतली आघाडी, भारत जर्मनीवीरुद्ध ५:३ असा सामना


राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नांदेड दौऱ्यासाठी रवाना, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्याचा करणार दौरा


राज कुंद्राच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, मुंबई सत्र न्यायालयात होणार सुनावणी, मुंबई गुन्हे शाखेने पोर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राला १९ जुलैला केलंय अटक


टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने जर्मनीविरुद्ध साधला दुसरा गोल, कॉर्नरवर गोल साधत भारताची शानदार खेळी, जर्मनीविरुद्ध ३-३ अशी बरोबरी


कर्नाटकमध्ये चंदनाची तस्करी करणाऱ्या दोन जणांना अटक, ४.५ करोड रुपयांचे ९ टन चंदन जप्त

- Advertisment -