धक्कादायक! १९ वर्षीय तरुणीवर ६ जणांनी केला सामूहिक बलात्कार

याप्रकरणातील ४ आरोपी फरार

uttar pradesh bareilly police arrested two accused in gang rape case of 19 year old girl

दोन मित्रांसोबत बाहेर गेलेल्या १९ वर्षीय तरुणीवर ६ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशमधील बरेली जिल्ह्यात ही घटना घडली असून याप्रकरणात इज्जतनगर पोलिसांना मोठे यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी ६ आरोपींपैकी दोन जणांना अटक केली आहे. उर्वरित आरोपींचा तपास सुरू आहे. यामधील एका आरोपीला पोलिसांच्या चकमकीदरम्यान अटक केली आहे.

पोलिसांच्या चकमकीत २२ वर्षीय आरोपी विशालच्या पायाला गोळी लागली आहे. याशिवाय दुसऱ्या आरोपीला दुसऱ्या ठिकाणाहून अटक केली आहे. या आरोपीचे नाव अनुज पटेल असे असून तो २३ वर्षांचा आहे. पण याप्रकरणातील ४ आरोपी फरार आहे. यांचा तपास करण्यासाठी पोलिसांचे एक पथक कार्यरत आहे.

केव्हा घटना घडली?

१३ मेला दोन मित्रांसोबत तरुणी बाहेर जात होती, त्यावेळीस ६ जणांनी तिच्यावर बलात्कार केला. तरुणीने लाज आणि भीती पोटी एफआयआर दाखल केला नाही. तसेच तिने घराच्यांना देखील याबाबत सांगितले नाही, असे पोलिसांनी सांगितले. पण जेव्हा ती अस्वस्थ राहू लागली, तेव्हा तिच्या घरच्यांनी तिला विचारले. त्यानंतर तरुणीने ६ आरोपींविरोधात तक्रार दाखल केली.

याबाबत पोलिसांनी सांगितले, पुढची कारवाई केली जात आहे. तरुणीची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. तसेच फरार झालेल्या आरोपींना अटक करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. रविवार दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.


हेही वाचा – संतापजनक! ३५ वर्षांच्या महिलेने १६ वर्षांच्या मुलावर दोनदा केला लैंगिक अत्याचार, अन् बलात्काराच्या केसची दिली धमकी