घरअर्थसंकल्प २०२२7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांचा 1 जुलैपासून वाढणार पगार; जाणून...

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांचा 1 जुलैपासून वाढणार पगार; जाणून घ्या किती मिळणार फायदा

Subscribe

सरकारने डीए7th pay commission central govt employees to get hiked salary from july 12022 know the difference 4 टक्क्यांनी वाढवला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा DA 34 टक्क्यांवरून 38 टक्क्यांवर होईल.

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ज्याची ते गेल्या अनेक महिन्यांपासून वाट पाहत होते. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 1 जुलैपासून वाढणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याची टक्केवारी 38 टक्क्यांवर येऊन पोहचणार आहे. या वाढत्या महागाई भत्त्याचा फायदा कर्मचाऱ्यांना पगारातील बंपर वाढीच्या रुपाने पाहयला मिळणार आहे. जाणून घ्या नेमका पगार वाढ कशी होईल.(7th Pay Commission)

महागाई भत्ता वाढणार

देशात सतत वाढणाऱ्या महागाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करणार आहे. ऑल इंडिया कंज्यूमर प्राईम इंडेक्सने मार्चमध्ये महागाई भत्ता 4 टक्के (AICPI) दराने वाढू शकतो अंदाज वर्तवला होता.

- Advertisement -

काय सांगते आकडेवारी?

जानेवारी आणि फेब्रुवारी 2022 मध्ये AICP निर्देशांकात (AICP index of july) घसरण झाली होती. एआयसीपी निर्देशांक जानेवारीत 125.1 वर होता, तो फेब्रुवारीमध्ये 125 वर होता, तर मार्चमध्ये तो 1 अंकाने वाढून 126 वर पोहोचला. एप्रिल-मे आणि जूनचे आकडे अजून यायचे आहेत. जर हा आकडा 126 च्या वर गेला तर सरकार डीए 4 टक्क्यांनी वाढवू शकते.

पगार किती वाढणार?

सरकारने (DA for central employees) डीए 4 टक्क्यांनी वाढवला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा DA 34 टक्क्यांवरून 38 टक्क्यांवर होईल. आता जास्तीत जास्त आणि किमान मूळ वेतनात किती वाढ होईल ते पाहू. (DA hike)

- Advertisement -

कमाल बेसिक पगारावरील कॅलकुलेशन

1. कर्मचार्‍यांचा बेसिक पगार – रु 56,900
2. नवीन महागाई भत्ता (38%)- रु 21,622/महिना
3. आतापर्यंतचा महागाई भत्ता (34%)- रु 19,346/महिना
4. किती महागाई भत्ता वाढला- 21,622- 19,346 = रु2,276 /महिना
5. वार्षिक पगारात वाढ – 2,276X12 = रु. 27,312

किमान बेसिक वेतनावरील कॅलकुलेशन

1. कर्मचार्‍यांचा बेसिक पगार – रु 18,000
2. नवीन महागाई भत्ता (38%) – रु 6840/महिना
3. आतापर्यंतचा महागाई भत्ता (34%)- रु. 6120/महिना
4. कितीने महागाई भत्ता वाढला- 6840- 6120 = रु 720/महिना
5. वार्षिक पगारात वाढ – 720 X12 = रु 8,640


Bharat Bandh 2022 : जातीनिहाय जनगणनेसाठी आज भारत बंदची हाक: काय होणार परिणाम?

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -