Kapil Sibal Resigned : ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांचा काँग्रेसला रामराम, सपाकडून राज्यसभेवर जाणार

Kapil Sibal Resigned Senior leader Kapil Sibal Filed samajwadi party through Rajya sabha Election
Kapil Sibal Resigned : ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांचा काँग्रेसला रामराम, सपाकडून राज्यसभेवर जाणार

राष्ट्रीय काँग्रेसमधील ज्येष्ठ आणि महत्त्वाचे नेते काँग्रेसचा हात सोडून दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि जी-२३ मधील प्रमुख नेते कपिल सिब्बल यांनी काँग्रेसमधील सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांच्यासोबत त्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. राज्यसभेवर कपिल सिब्बल हे सपाकडून जाणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत सपाचे वरिष्ठ नेते आणि राज्यसभा सदस्य रामगोपाल यादव उपस्थित होते.

राज्यसभा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. मी आज अपक्ष उमेदवार म्हणून राज्यसभेसाठी अर्ज दाखल केला आहे. यासाठी मी सपा नेते रामगोपाल यादव आणि आझम खान यांचे आभार मानतो. ज्यांनी मला मागील वेळी मदत केली आहे. दरम्यान आता मी काँग्रेसचा नेता राहिलो नाही. १६ मे रोजी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. राज्यसभेत कोणत्याही पक्षाशिवाय जनतेसाठी आवाज उठवणार आहे. प्रत्येक अन्यायाविरोधात लढा देणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

समाजवादी पक्षाकडून सिब्बल यांना मिळालेले हे मोठे बक्षीस मानले जात आहे. कपिल सिब्बल हे ज्येष्ठ वकील आहेत. संसदेतही त्यांनी आपले मत चांगले मांडले आहे. ते सुप्रीम कोर्टात आझम खान यांचे वकील आहेत. पक्षाने त्यांना राज्यसभेवर पाठवले तर मला खूप आनंद होईल, असे खान यांनी मंगळवारी आधी सांगितले होते. समाजवादी पक्षाकडून सिब्बल यांना मिळालेले हे मोठे बक्षीस मानले जात आहे.

कपिल सिब्बल काँग्रेसमध्ये नाराज

काँग्रेस नेते कपिल सिब्बल काँग्रेसमध्ये मागील काही काळापासून नाराज चालले होते. ते जी-२३ गटाचे भाग होते. पक्षाच्या ध्येय आणि धोरणांवर त्यांची नाराजी होती. काहीच कल्पना न देता त्यांनी काँग्रेसच्या पदाचा राजीनामा दिला होता. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित कपिल सिब्बल यांनी केले होते.


हेही वाचा : ओबीसी आरक्षणासाठी भाजपचा मंत्रालयावर मोर्चा, प्रवीण दरेकर, मुनगंटीवार पोलिसांच्या ताब्यात