घरअर्थसंकल्पीय अधिवेशन 2023तुम्ही झाडामध्ये जळणारे द्रव्य टाकले, युतीवरून सुधीर मुनगंटीवारांचा उद्धव ठाकरेंना टोला

तुम्ही झाडामध्ये जळणारे द्रव्य टाकले, युतीवरून सुधीर मुनगंटीवारांचा उद्धव ठाकरेंना टोला

Subscribe

झाडे लावण्याच्या आणि त्याचे संवर्धन करण्याच्या मुद्द्यावरून विधान परिषदेत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रश्न-उत्तराच्या तासाला उद्घव ठाकरे यांना टोला लगावला. त्यांच्या या टोल्याने सभागृहात उपस्थित असलेले उद्धव ठाकरे यांना सुद्धा आपले हसू आवरता आले नाही.

आज गुरूवारी विधान परिषदेच्या सभागृहात उद्धव ठाकरे यांनी सुद्धा हजेरी लावली होती. विधान भवनात उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. पण विधान परिषदेच्या सभागृहात वनमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी उद्धव ठाकरे यांना युतीवरून मारलेल्या अप्रत्यक्ष टोल्याची आता सर्वाधिक चर्चा करण्यात येत आहे.

सभागृहामध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी इको बटालियनच्या माध्यमातून लावण्यात येणाऱ्या झाडांचे संवर्धन करण्यात येणार का? असा प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, यासाठी राज्य सरकारकडून पाऊले उचलण्यात येत आहेत. इको बटालियनच्या माध्यमातून एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासहित अनेक नेत्यांनी हजेरी लावत झाडांची लागवड केली होती. याचवेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, पण त्या झाडाला अजूनतरी फळे नाही आलेली.

- Advertisement -

उद्धव ठाकरे वक्तव्याला उत्तर देताना मुनगंटीवार म्हणाले की, ते झाड चांगले आहे. त्या झाडाला फळे येतील, असे मी अनेकदा भेटून सांगत होतो. पण तुम्ही झाडाशी नाते तोडलं. आता त्याला काय करणार. मी व्यक्तिगत येऊन तुम्हाला सांगायचो की, उद्धवजी या झाडाला कोणते खत पाहिजे. पण तुम्ही ते खत न देता दुसरंच खत दिला. त्याच्यामध्ये झाडाला फळं कशी येतील?. तुम्हाला एकदा नाही तर तीनदा विनंती केली. खतच होत फक्त ते निरमा पॉकेटमध्ये आणलं, म्हणून तुमचा गैरसमज झाला फक्त त्यावर नाव दुसरं होत, असे म्हणत मुनगंटीवार यांनी युतीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.

दरम्यान, उद्धव ठाकरे आणि सुधीर मुनगंटीवार यांच्याध्ये नेमके कशावरून बोलणे होत आहे, याबाबत सभागृहात उपस्थित असणाऱ्या सर्व सदस्यांना कळले होते. पण मुनगंटीवार ज्याप्रमाणे झाडांच्या संवर्धनाची आणि लागवडीची माहिती देत याबाबत बोलत होते, त्यामुळे मात्र एकच हशा पिकलेला पाहायला मिळाला. तर मुनगंटीवार हे ठाकरेंना पुन्हा सोबत येण्याची खुली आॅफर देत असल्याचेही यावेळी त्यांनी केलेल्या वक्तव्यातून दिसून आले.

- Advertisement -

हेही वाचा – तुम्ही झाडाशी नातं तोडलं, मुनगंटीवारांचा ठाकरेंवर हल्लाबोल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -