घरअर्थजगत7th Pay Commission : मोठी बातमी! केंद्र सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात...

7th Pay Commission : मोठी बातमी! केंद्र सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

Subscribe

सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०२२ पासून वाढीव महागाई भत्त्याचा फायदा होणार आहे. या बाबतीत मोदी सरकारनं अधिकृत घोषणा केली आहे. सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतन धारकांना महागाईच्या प्रभावापासून वाचवण्यासाठी त्यांच्या पगार/पेन्शनमध्ये हा घटक जोडला जाणार आहे.

केंद्र सरकारच्या लाखों कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार पुन्हा एकदा केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) वाढ केलीय. सूत्रांच्या माहितीनुसार, यावेळी महागाई भत्ता ३ टक्क्यांनी वाढवला गेला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने 1 जानेवारी 2022 पासून केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता (DA) आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात (DR) 3% ते 34% वाढ केली आहे.

१ जानेवारीपासून कर्मचाऱ्यांना होणार फायदा

- Advertisement -

सध्या केंद्र सरकार महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा केली आहे. या संदर्भात केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०२२ पासून वाढीव महागाई भत्त्याचा फायदा होणार आहे. या बाबतीत मोदी सरकारनं अधिकृत घोषणा केली आहे. सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतन धारकांना महागाईच्या प्रभावापासून वाचवण्यासाठी त्यांच्या पगार/पेन्शनमध्ये हा घटक जोडला गेला आहे.


केंद्रीय कर्मचाऱ्यांची होणार चांदी

- Advertisement -

महागाई भत्त्यामध्ये वाढ झाल्यामुळे एप्रिल महिन्यामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांची चांदी होणार आहे. होळीपूर्वी सरकारने महागाई भत्ता वाढवला आहे. या घोषणेला उशीर झाल्याने आणि वाढीव महागाई भत्त्या जानेवारीपासूनच लागू झाल्याने आता या कर्मऱ्यांना मिळणार्‍या पगारात लक्षणीय वाढ झालेली आहे. याचे कारण म्हणजे त्यांना आता मार्चचा भत्ता जानेवारी आणि फेब्रुवारीचा मिळून असणार आहे.

आता मिळणारा महागाई भत्ता

सध्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना ३१ टक्के इतका महागाई भत्ता मिळतो, सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार सरकारने महागाई भत्त्यामध्ये ३ टक्के वाढ केल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता ३४ टक्के झालाय. ७ व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार, केंद्रीय सरकार वर्षातून दोनदा (जानेवारी आणि जुलैमध्ये) महागाई भत्त्यामध्ये सुधारणा करते. यापूर्वी, गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता २८ टक्क्यांवरून ३१ टक्के केला होता.

अनेकांना होणार फायदा

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे अनेकांना त्याचा फायदा होणार आहे. सध्या देशभरात ५० लाखांपेक्षा जास्त केंद्रीय कर्मचाऱ्यांची संख्या आहे. तसेच ६५ लाख माजी केंद्रीय कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळत आहे. त्यामुळे महागाई भत्ता वाढवून १.१५ कोटींपेक्षा जास्त लोकांना होत आहे.


हेही वाचा : गुढीपाडव्यापूर्वी निर्बंध शिथिल करण्याच्या हालचालींना वेग, आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे वक्तव्य

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -