गुढीपाडव्यापूर्वी निर्बंध शिथिल करण्याच्या हालचालींना वेग, आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे वक्तव्य

Rajesh Tope said will not relax the mask use but cm thackeray soon announce relax restrictions before Gudi Padwa

राज्यातील कोरोना काळात लागू करण्यात आलेले निर्बध १ एप्रिलपासून शिथिल करण्याबाबतच्या हालचाली सुरु असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्बंध शिथिल करण्याबाबत चर्चा करत आहेत. योग्य वेळी सर्व विभागांशी चर्चा करुन मुख्यमंत्री निर्णय घेतील असे राजेश टोपे म्हणाले आहेत. तसेच सध्या तरी मास्क मुक्तीबाबत विचार नसून तसे धाडस करुन चालणार नाही असे राजेश टोपेंनी सांगितले. राज्यातले जे काही निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत त्यामागे लसीकरण वाढवण्याबाबतचा विचार असल्याचे राजेश टोपे म्हणाले.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी राजेश टोपे म्हणाले की, सध्या राज्यातील निर्णय शिथिल करण्यात आले आहेत. रेल्वेच्या संदर्भात जे काही विषय असतील, बसमधील असतील, दोन लसीकरणाच्या नियमाबाबत असतील हे यासाठी ठेवण्यात आले आहे कारण राज्यात लसीकरणाचे प्रमाण वाढले पाहिजे. आज १८ वर्षाच्या पुढील लसीकरण प्रमाण ९२ टक्के आहे. तर दुसऱ्या डोसचे प्रमाण ७४ टक्के आहे. म्हणजे अजूनही २५ टक्के लोक दुसऱ्या डोससाठी बाकी आहे. १५ ते १८ वयोगटात शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना २६ टक्के लस देण्यात आली आहे. यामध्ये पहिल्या डोसचे प्रमाण ६२ टक्के तर दुसऱ्या डोसचे प्रमाण ४० टक्के आहे. १०० टक्के टार्गेट करायचे आहे त्यामुळे लसीकरणावर भर देण्यात आला आहे. लसीकरणात ढिलाई करु नये असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.

मुख्यमंत्री निर्बंध शिथिल करण्याबाबत निर्णय घेतील

या सगळ्या संदर्भाने आपत्कालीन कायद्यांतर्गत जे काही निर्बंध लावले जातात आणि शिथिल करण्यात येतात या संदर्भात वेगवेगळ्या मागण्या येत असतात. त्या मागण्या मुख्यमंत्र्यांकडे देऊन त्यांच्या माध्यमातून नियमांचे शिथिलीकरण मग ते रेल्वे, बस, मॉल्सबाबत असतील याबाबत टास्क फोर्सशी चर्चा करुन सोडवल्या जातील. गुढी पाडवा सण आपण साजरा करतो यावर काही निर्बंध नाही आहेत. सर्वांना साजरा करण्याची परवानगी दिली आहे. शोभा यात्रांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील. असे मला विश्वास आहे. त्यासंदर्भात त्यांच्यापर्यंत हा विषय चर्चेला जाऊन वेगवेगळे घटक आहेत. आरोग्य विभाग, पोलीस विभाग, टास्क फोर्स यांच्याशी चर्चा करुन मुख्यमंत्री निर्णय घेत असतात आणि ते निर्णय घेतील असा माझा विश्वास असल्याचे राजेश टोपे म्हणाले.

मास्क मुक्तीबाबत अद्याप विचार नाही

मास्क मुक्तीच्या संदर्भात अद्यापही दुसऱ्या देशात जे काही चौथ्या लाटेचा परिणाम पाहतो आहोत. त्यामुळे आपण मास्क न घालण्याचे धाडस करुन फायदा नाही. निश्चित गर्दीच्या ठिकाणी आपण असताना मास्क वापरला पाहिजे. आपल्या स्वतःच्या आऱोग्यासाठी फायदेशीर आहे. तुर्तास मास्क मुक्तीबाबत कोणताही विचार केला नाही. ज्यावेळी तशी परिस्थिती वाटेल त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर अशी घोषणा केली जाईल. असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. मला असं वाटतं की, बऱ्यापैकी मास्क जर सोडलं तर अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. शहरात गर्दी झाली आहे. बाजारपेठा फुलल्या आहेत. वाहतुकीदरम्यान गर्दी झाली आहे. परदेशात महत्वाच्या देशात चौथी लाट असताना राज्यात काही निर्बंध लादले नाहीत. ज्या काही गोष्टी राहिल्या आहेत. त्या लसीकरणाशी संदर्भात असतील तर लसीकरण करुन घ्यावं यासाठी ते निर्बंध ठेवण्यात आले आहेत. केंद्र सरकार आणि आयसीएमआरकडून माहिती घेऊन निर्णय घेण्यात येतील.


हेही वाचा : SSC Paper Leak : दहावीच्या २ विषयांचा पेपर फुटला?, ५०० रुपयांना प्रश्नपत्रिकांची विक्री