घरक्राइमऑनलाईन व्यवहारात बांधकाम व्यावसायिकाची २३ लाख ८० हजारांची फसवणूक

ऑनलाईन व्यवहारात बांधकाम व्यावसायिकाची २३ लाख ८० हजारांची फसवणूक

Subscribe

सिमेंटची ऑनलाईन ऑर्डर देणे व बँक व्यवहार करणे एका बांधकाम व्यावसायिकाला पडले महागात

सिमेंटची ऑनलाईन ऑर्डर देणे व बँक व्यवहार करणे एका बांधकाम व्यावसायिकाला चांगलेच महागात पडले. या व्यवहारात व्यावसायिकाची २३ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक झाली. याप्रकरणी दोन इसमांच्या विरुद्ध मध्यवर्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उल्हासनगर येथे राहणारे रणजीत मोहनदास रूपचंदानी (४८) हे बांधकाम व्यावसायिक असून उल्हासनगर – येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाजवळ त्यांच्या ईगलनेस्ट या कंपनीचे कार्यालय आहे. रणजितला बांधकाम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सिमेंटच्या गोण्यांची आवश्यकता होती. यासंदर्भात त्यांनी त्यांचे कार्यालयात वर्किंग पार्टनर शंकर भाटिया यांच्याशी चर्चा केली आणि ऑनलाइन अंबुजा सिमेंटच्या गोण्या मागविण्याचा निर्णय घेतला. शंकर यांनी गुगल सर्च करून त्यात अंबुजा सिमेंटच्या डीलरचा नंबरचा शोध घेतला असता त्यांना चंद्रपूर जिल्ह्यातील सौरभ त्रीपाठी आणि नितीन सिंग या दोन व्यक्तींचे मोबाईल नंबर मिळाले. सौरभ त्रिपाठी हा सिमेंटचा डीलर तर नितीन सिंग हा त्याचा सहाय्यक असल्याची माहिती देण्यात आली होती.

शंकर भाटिया यांनी सौरभ त्रिपाठी याच्याशी संपर्क करून सिमेंटच्या व्यवहाराबाबत चर्चा केली तेव्हा सौरभने त्याचा फोटो शंकर यांना पाठविला आणि त्यांचा विश्वास संपादन केला . पुढे काही दिवसांत शंकर यांनी ईमेलवर सौरभला ऑर्डर पाठवली त्यानंतर सौरभने त्याचा बँक अकाउंट नंबर शंकर देऊन त्या अकाउंट मध्ये सिमेंटच्या ऑर्डरसाठी २३ लाख ८० हजार रुपये ऑनलाईन ट्रान्स्फर करण्यास सांगितले. यानंतर ईगल कंपनीमार्फत सौरभच्या अकाउंट मध्ये नमूद रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर देखील केली गेली. अनेक दिवस झाले तरी सिमेंट न मिळाल्याने ईगल कंपनीचे रणजित व शंकर यांनी सौरभ व नितीन यांच्याशी संपर्क साधला असता ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले व नंतर त्यांचा मोबाईल नंबर देखील स्विच ऑफ येऊ लागला .

- Advertisement -

या संदर्भात रणजित यांनी इतर जिल्ह्यातील अंबुजा सिमेंट कंपनीच्या मॅनेजर सोबत संपर्क साधला असता सौरभ त्रिपाठी आणि नितीन सिंग नावाचे कोणतेही व्यक्ती सिमेंट कंपनीशी संबंधित नाही अशी माहिती देण्यात आली . आपली फसवणूक झाली आहे हे लक्षात आल्यानंतर रणजित यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात आरोपी सौरभ त्रिपाठी आणि नितीन सिंग यांच्याविरोधात तक्रार केली. या तक्रारीनंतर काल पोलिसांनी आरोपींच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे . या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश राळेभात हे करीत आहेत .

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -