Sunday, June 11, 2023
27 C
Mumbai
घर क्राइम सावधान : आवाजाची नक्कल करून फसवणूक; 50 टक्के लोक AI स्पॅम कॉलमुळे...

सावधान : आवाजाची नक्कल करून फसवणूक; 50 टक्के लोक AI स्पॅम कॉलमुळे त्रस्त

Subscribe

नवी दिल्ली : नातेवाईकांनी फोन करून पैसे मागितल्यास सावधान, कारण आता ठगांनी तुमच्या नातेवाईकांच्या आवाजाची नक्कल करून पैसे कमवण्याचा नवा मार्ग शोधला आहे. ही बाब सायबर सिक्युरिटी एजन्सी मॅकॅफीच्या नव्या अहवालात समोर आली आहे.

लोकांची फसवणूक करून पैसे कमवणे सोपे झाल्यामुळे ठग नवीन नवीन युक्ती शोधत असतात. ठगांनी आता लोकांची फसवणूक करण्याचा नातेवाईकांच्या आवाजाची नक्कल करून लोकांकडे पैसे मागत आहेत. तुम्हालाही कुटुंबातील सदस्याचा कॉल किंवा एखाद्या मित्राचा व्हॉईस मेसेज आला तर त्यावर विश्वास ठेवू नका, अन्यथा तुमचे मोठे नुकसान होऊ शकते, त्यामुळे कॉलवर विश्वास ठेवू नका असे आवाहन भारत सरकारने केले आहे. स्पॅम कॉल (Scam Call) करणाने आपल्या नातेवाईकांच्या आवाजाची नक्कल करून लोकांकडे पैसे मागत आहेत. त्यामुळे हे स्पॅम कॉल्स थांबवण्यासाठी भारत सरकारकडून विविध पावले उचलली जात आहेत, मात्र सरकारला यश मिळत नाही. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण देखील यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, परंतु त्याचाही काही उपयोग होत नाही.

- Advertisement -

स्पॅम व्हॉईस कॉल्स AI द्वारे येतात
स्पॅम कॉल्स ब्लॉक करण्यासाठी TRAI ने मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) देखील वापरून बघितले, पण त्यांना यश मिळाले नाही. आश्चर्याची बाब म्हणजे हे स्पॅम व्हॉईस कॉल्स केवळ AI द्वारे केले जात असल्याची बाब सायबर सिक्युरिटी एजन्सी मॅकॅफीच्या नव्या अहवालात समोर आली आहे. मॅकॅफीने आपल्या अहवालात म्हटले की, देशातील ८३ टक्के स्पॅम कॉल मशीनद्वारे केले जात आहेत की, माणसांकडून हे शोधण्यात अक्षम आहेत. रिपोर्टनुसार असे समोर आले की, आवाज बदलूनही लोकांची फसवणूक होत आहे.

मॅकॅफीच्या सर्वेक्षणात सात हजारांहून अधिक लोकांवर सर्वेक्षण
मॅकॅफीच्या सर्वेक्षणात सात देशांतील 7,054 लोक सहभागी झाले होते. त्यापैकी 1,010 भारतातील होते. सर्वेक्षणात सहभागी भारतीय लोकांनी सांगितले की, त्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरून सर्वाधिक स्पॅम कॉल येतात. मशिनद्वारे लोकांच्या आवाजाची नक्कल करून कॉलद्वारे कुटुंबीय व नातेवाईकांची फसवणूक केली जात असल्याचे अहवालात समोर आले आहे. सुमारे 47 टक्के प्रौढ भारतीयांना स्पॅम कॉल्सच्या समस्येशी सामना करावा लागतो आहे. फोनवर आवाज ओळखता येत नसल्यामुळे त्यांचे 50,000 रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले असल्याचा दावा 83 टक्के भारतीयांनी केला आहे.
सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 69 टक्के भारतीयांनी सांगितले की, त्यांना मशीनचा आणि खरा आवाज ओळखण्यात अडचण येत आहे. त्याचवेळी 66 टक्के लोकांनी सांगितले की, मित्रांच्या आवाजात व्हॉइसमेल किंवा व्हॉइस संदेशांना मोठ्या प्रमाणावर येतात. यातील बहुतेक संदेश पैशाच्या गरजेबद्दल आहेत. यातील 70 टक्के लोकांचे नुकसान झाले आहे. फोनवर जो व्हॉईसमेल येतो, त्यावरून त्यांचे नुकसान झाल्याचा त्यांनी दावा केला आहे. फोनवर येणारे 69 टक्के संदेश कार अपघातांबद्दल असतात, तर 65 टक्के फोन चोरी किंवा हरवलेल्या पर्सबद्दल असतात. त्यामुळे अशाप्रकारचा कॉल तुम्हाला आल्यास आधी तो तपासा आणि मगच मदतीचा प्रयत्न करा, अन्यथा तुमचे खूप मोठे नुकसान होऊ शकते.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -