घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनापास होण्याच्या भीतीने केले मनात घर, भावी डॉक्टरने संपवले जीवन

नापास होण्याच्या भीतीने केले मनात घर, भावी डॉक्टरने संपवले जीवन

Subscribe

नाशिक : सातपूरमधील शिवाजीनगर भागात एका वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्याने नैराश्यातून गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि.२५) घडली. पोलिसांनी सुसाईड नोट सापडली असून, त्यामध्ये नापास होण्याची भिती व्यक्त केली आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. योगेश दत्तात्र्य बोबडे (वय २१, मूळा रा. राहाता, जि. अहमदनगर) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश बोबडे हा गंगापूररोड भागातील अपना घर या निवासी गृहनिर्माण प्रकल्पात भाड्याने फ्लॅट घेत विद्यार्थ्यांसमवेत राहत होता. तो मोतीवाला होमिओपॅथी महाद्यिालयात तो बीएचएमएसच्या दुसर्‍या वर्षात शिक्षण घेत होता. त्याने आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली. ती पोलिसांना मिळाली आहे. त्यात त्याने पेपर लिहिताना हाताचा थरकाप होत असल्याने त्याने नैराशेतून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पुढील तपास गंगापूर पोलीस करीत आहेत.

- Advertisement -

नापास होण्याची भीती 

परीक्षेत अनुत्तीर्ण होण्याच्या भीतीसह आजारपणामुळे अधिक वैफल्यग्रस्त झालेल्या योगेशने मंगळवारी दुपारी राहत्या खोलीत गळफास घेत जीवन संपवले. दरम्यान, योगेशने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत या कारणांचा उल्लेख केला आहे. त्यावरुन गंगापूर पोलिसांनी अकस्मात मृत्यू नोंदवून तपास सुरू केला आहे. त्याच्या आत्महत्येनंतर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सिव्हिलमध्ये गर्दी केली. योगेशचे कुटुंबीय रात्री उशिराने गावावरुन नाशिकमध्ये दाखल झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -