घरमुंबईLok Sabha : भाजपाने विकसित भारताची दाखवलेली स्वप्न पूर्ण झाली का? आदित्य...

Lok Sabha : भाजपाने विकसित भारताची दाखवलेली स्वप्न पूर्ण झाली का? आदित्य ठाकरेंचा सवाल

Subscribe

भाजपाने विकसित भारताची दाखवलेली स्वप्न पूर्ण झाली का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे.

मुंबई : शिवसेना युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांचा संपूर्ण महाराष्ट्रात ‘शाखा संवाद’ दौऱ्यातून झंझावात सुरू आहे. आज मुंबईत कुलाबामधील गीता नगर येथे या दौऱ्याचं आयोज करण्यात आलं होतं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत हे पुन्हा एकदा लोकसभेच्या रिंगणात विजयाची हॅट्रिक करण्यासाठी उतरले आहेत. अरविंद सावंत यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे यांच्या शाखा संवाद दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं, यावेळी हजारो मुंबईकरांनी सभेला हजेरी लावली होती. (Lok Sabha Election 2024 BJP’s dream of a developed India fulfilled Aditya Thackeray)

सभेला संबोधित करताना गीता नगरची जनता अरविंद सावंतांसोबत असल्याचा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर आपण अनेक वर्ष इथे येत आहोत, पण जी विकासगंगा दक्षिण मुंबईत मागील दहा वर्ष पाहिली. ती आधी नव्हती ‘इथे वॉटर माफिया राज मोठा होता’. मात्र अरविंद सावंत यांनी ते आधी बंद केले आणि म्हणून गीता नगरची जनता अरविंद सावंत यांच्या सोबत राहणार, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha 2024 : अजित पवारांवर गुन्हा दाखल करा! अंबादास दानवेंची मागणी

400 पारचा नारा संविधान बदलण्यासाठी? (400 Parcha slogan to change the constitution?)

भाजपाच्या 400 पारच्या नाऱ्यावर आदित्य ठाकरे यांनी हल्लाबोल चढवला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘जनतेने आता कोणत्या दिशेने मतदान करायचे हे ठरवले पाहिजे. तुमच्या हातात जो मतदानाचा अधिकार आहे तो राहणार की नाही, हे आता ठरणार आहे. भाजपाच्या अनेक जणांकडून सांगितले जात आहे की आम्हाला चारशे पार करायचं आहे. कारण त्यांना संविधान बदलायचा आहे आणि हे तुम्हाला मान्य आहे का? भाजपाला तुमचं ऐकायचं नाहीय. त्यांना फक्त स्वतःच सांगायचं आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

भाजपाने दाखवलेली स्वप्न पूर्ण झाली का? (Has the dream shown by BJP come true?)

भाजपाने जनतेची दिशाभूल करताना निवडणुकीत अनेक स्वप्न सर्वसामान्यांना दाखवली होती, मात्र प्रत्यक्षात स्थिती कायम उलट राहिली, त्यामुळे भाजपाच्या फसव्या धोरणांचा जनतेला सवाल करून आदित्य ठाकरे यांनी बुरखा फाडला. आदित्य ठाकरेंनी जनतेला सवाल केले की, 2014 मध्ये वचन दिली ती पूर्ण झाली का? खात्यात 15 लाख रुपये आले का? महागाई कमी झाली का? गॅस सिलेंडर स्वस्त झाला का? पेट्रोल डिझेल यांच्या आधी किमती काय होत्या आणि आता काय आहेत? विकसित भारताची जी स्वप्न दाखवली ती पूर्ण झाली का? काळा पैसा परत आणणार असं म्हणाले होते, पण यांचा इलेक्ट्रॉल बाँडचा घोटाळा बाहेर आला. 2014 आणि 2019 मध्ये ज्या गोष्टी त्यांनी सांगितल्या त्यावर ते आता बोलत नाहीत, आता ते म्हणतात की, विरोधी पक्षातील लोक नॉनव्हेज खातात. 100 स्मार्ट सिटी बनवणार होते त्याचं काय झालं? असा प्रश्नांचा भडीमार आदित्य ठाकरेंनी भाजपावर केला आहे.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : तटकरेंनी विधानसभेला आमची गॅरंटी घ्यावी, नाहीतर…; भरत गोगावलेंचा इशारा

कोविड काळात स्थानिक आमदार कुठे होते? (Where was the local MLA during covid?)

कोवीड काळात मुंबईने संपूर्ण देशच नव्हे तर जगाला आदर्श दिला, जगाने गौरवलेल्या पॅटर्न राबवणारे तत्कालीन मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात शिवसैनिक रस्त्यावर उतरून काम करत होते, त्यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘महाराष्ट्रात मागील दोन ते अडीच वर्षातचे राजकारण झालं ते खूप गलिच्छ झालं आहे. पण कोविड काळात एक तरी भाजपाचा माणूस तुमच्या दारात आला का? तेव्हा महाविकास आघाडी सरकारने जे काम केलं त्याचं कौतुक आंतरराष्ट्रीय पातळीवर झालं. तुम्ही सर्वांनी मुंबई वाचवली ती ही मुंबई आहे. मुंबईमध्ये चक्रीवादळ आलं होतं, पण या सगळ्या संकटाच्या काळात इथले आमदार, विधानसभेचे अध्यक्ष ते कोविड काळात कुठे होते? असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -