घरक्राइमअंगावर कोब्रा सोडत घेतला पत्नीचा जीव, दोषी पतीविरोधातील शिक्षेच्या सुनावणीकडे लक्ष

अंगावर कोब्रा सोडत घेतला पत्नीचा जीव, दोषी पतीविरोधातील शिक्षेच्या सुनावणीकडे लक्ष

Subscribe

अंगावर विषारी क्रोबा सोडत पत्नीची हत्या केल्याप्रकरणी केरळमधील एक दोषी पतीविरोधात कोर्टात सुनावणी पार पडली. यात आरोपी पती सुरजने हुंड्यासाठी २५ वर्षीय पत्नी उत्तराचा हुंड्यासाठी छळ करत हत्या केली. या प्रकरणी कोल्लमच्या सत्र न्यायालयाने निकाल दिला असून बुधवारी शिक्षेची सुनावणी होणार आहे.

सुरज आणि उत्तराचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना एक वर्षाचे मूलही आहे. सूरज उत्तराकडे अनेकदा हुंड्याची मागणी करत तिचा छळ करत होता. दरम्यान ७ मे २०२० च्या रात्री सूरज आणि उत्तरा जेवून झोपी गेले. दुसऱ्या दिवशी रोज लेट उठणारा सुरज सकाळी उत्तराच्या आधी उठला. त्याच रात्री पती सुरजने पत्नी उत्तरा झोपेत असताना तिच्या अंगावर कोब्रा साप सोडला. सापाच्या दंशामुळे तिचा मृत्यू झाला. या संपूर्ण कटाआधी त्याने पत्नीला झोपेच्या गोळ्या दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. तपासात असेही समोर आले की, गेल्या वर्षी २ मार्च रोजीही सुरजने पत्नीची हत्या करण्याच्या उद्देशाने घरात कोब्रा सोडला होता.

- Advertisement -

मात्र या घटनेतून ती थोडक्यात बचावली होती. त्यावेळी तिला तिरवल्ला येथील खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात तिच्यावर जवळपास १६ दिवस उपचार सुरु होते. रसेल वायपर साप चावल्यामुळे ती पूर्णपणे आजारी पडली यात तब्बल ५२ दिवस ती अंथरुणावर पडून होती. यानंतर तिची प्लास्टिक सर्जरीही करावी लागली होती. पोटच्या मुलीचा संसार वाचवण्यासाठी उत्तराच्या आईने सुरजला १० लाख रुपये रोख, मालमत्ता, नवीन कार आणि सोने दिल्याचा दावा केला. मात्र दोन वर्षांच्या अयशस्वी विवाहानंतरही त्याने अधिक हुंडा मागण्याचा प्रयत्न केला, असा आरोप उत्तराच्या आईने केला.

मात्र उत्तराच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबीयांनी उपस्थित केलेल्या संशयावरून सुरजला २४ मे रोजी अटक करण्यात आली. यात १२ जुलै रोजी सुरजने त्याने कोल्लममधील परीपल्ली येथील गारुडी सुरेश कुमार यांच्याकडून १० हजार रुपयांना दोन वेळा साप खरेदी करुन तो पत्नीच्या अंगावर सोडल्याची जाहीर कबूली दिली. १ नोव्हेंबर रोजी दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, सुरजने दोन वेळा विषारी साप सोडून उत्तराला मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे कोर्टानेही सर्व घटनेचा तपास आणि त्य़ातील सुरजविरोधातील पुराव्यांचा आधारे त्याला दोषी जाहीर केले. त्यामुळे उत्तराचा जीव घेणाऱ्या पती सुरजविरोधातील निकालाची तिचे आई-वडील आतुरतेने वाट पाहत आहेत. या प्रकरणी बुधवारी शिक्षेची सुनावणी होणार आहे.


घरात पैसा ठेवत नाही, मग टाळा का लावता? उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी चोराने सोडली चिठ्ठी


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -