धक्कादायक! एकतर्फी प्रेमातून भावाचा जडला बहिणीवर जीव, अश्लील फोटो केले व्हायरल

भाऊ आपल्या बहिणीच्याच प्रेमात पडला. तिने नकार देताच त्याने तिचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले.

man loves cousin viral her morphed-photos in bihar chhapra
धक्कादायक! एकतर्फी प्रेमातून भावाचा जडला बहिणीवर जीव, अश्लील फोटो केले व्हायरल

हल्ली कोण कोणाच्या प्रेमात पडेल काही सांगता येत नाही. प्रेमात पडून पुढे काय होईल हे सांगता येत नाही. प्रेमात नकार मिळाल्यानंतर तरूण तरूणी अनेक गैरप्रकार करत असतात. असे अनेक प्रकार आजवर समोर आले आहेत. असाच एक विचित्र प्रकार बिहारमधून समोर आला आहे. एक भाऊ आपल्या बहिणीच्याच प्रेमात पडला. तिने नकार देताच त्याने तिचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. या प्रकारामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.

बिहारच्या छपरा येथे एक भाऊ आपल्या बहिणीच्या प्रेमात पडला. हिमांशु कुमार असे त्या तरूणाचे नाव आहे. त्याच त्याच्या चुलत बहिणीवर एकतर्फी प्रेम होत. मात्र तिने त्याला नकार दिला होता. प्रत्येक वेळी हिमांशु बहिणीचे ठ
रलेले लग्न मोडत असे. बहिणीने आणि तिच्या घरच्यांनी अनेकदा समजावूनही हिमांशु त्यांना त्रास देत होता.

या वेळी तरूणीचे लग्न ठरले होते. तिचा होणारा नवरा सिवानमध्ये राहणारा होता. हिमांशुला ही खबर कळताच त्याने हे लग्न मोडायचा घाट घातला. लग्न मोडण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू केले. पण त्याचा काहीच परिणाम झाला नाही. तरूणी लग्नासाठी बोहल्यावर चढणार त्याआधीच हिमांशुने तरूणीचे अश्लील फोटो तिच्या सासरच्या मंडळींना पाठवले. फोटो पाहताच तरूणीचे ठरलेले लग्न भर मांडवात मोडायचे ठरवले. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी तरूणी आणि तिच्या सासरची मंडळी तिच्या गावी पोहचले. गावी गेल्यानंतर हे फोटो हिमांशुनेच तरूणीच्या सासरच्या मंडळींना पाठवल्याचे समोर आले.

संतापलेल्या तरूणीने तिच्या चुलत भावाची पोलिसांत तक्रार दाखल केली. हिमांशु विरूद्ध सबळ पुरावे असल्याने पोलिसांना त्याला अटक केली. तरूणीचे वडिल वारल्यानंतर हिमांशु गेली अनेक वर्ष त्यांना त्रास देत होता. तरूणी आणि तिची आई दोघीच घरी राहत होत्या, अशी माहिती पोलिसांच्या तपासदरम्यान समोर आली.


हेही वाचा – लग्न सोहळ्यात जिल्हाधिकार्‍यांच्या पाकिटावर चोरट्याचा डल्ला