घरक्राइमPorn Films case : शर्लिन चोप्राला मुंबई पोलिसांनी बजावला समन्स, आज होणार...

Porn Films case : शर्लिन चोप्राला मुंबई पोलिसांनी बजावला समन्स, आज होणार चौकशी

Subscribe

राज कुंद्राने पॉर्न फिल्मच्या व्यवसायात घुसवले आहे, असा दावा शर्लिनने केला आहे.

 

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला पॉर्न व्हिडिओ निर्मिती  प्रकरणी अटक झाल्यानंतर अनेक महत्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागत आहे. या संपुर्ण रॅकेटमध्ये अनेक प्रसिद्ध व्यक्तींचा हात असल्याची माहिती समोर येत आहे. राज कुंद्राच्या अटकेनंतर आता अभिनेत्री शर्लिन चोप्राला मुंबई गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलकडून समन्स बजावण्यात आला असून तिला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. फेब्रुवारी महिन्यात पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलने मालाड पश्चिम येथील मढ गावातील बंगल्यावर कारवाई केली होती. तसेच तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी जुलै 2021 मध्ये राज कुंद्राला अटक केली यानंतर सबंधीत प्रकरणात आणखी काही जणांचा हात असल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे हे खूप मोठं रॅकेट असून याचा तपास पोलिस करत असल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

शर्लिनने मागितला होता अटकपूर्व जामीन 

दरम्यान, शर्लिन चोप्राला या सर्व प्रकरणात राज कुंद्रासोबत सह आरोपी केलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच अटकेच्या भीतीने शर्लिनने मुंबई सत्र न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामीन मिळवण्याची मागणी केली होती. मात्र सत्र न्यायालयाने शर्लिनची ही मागणी फेटाळून लावली आहे. यानंतर आता शर्लिनला पॉपर्टी सेलकडून समन्स बजावण्यात आलं असून. आज 6 ऑगस्ट रोजी तिला चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.

- Advertisement -

गहना वशिष्ठाला सुद्धा बजावला होता समन्स

मुंबईच्या क्राईम ब्रांचच्या प्रॉपर्टी सेलने काही दिवसांपुर्वी शर्लिन चोप्रासोबत गहना वशिष्ठाला सुद्धा समन्स बजावला होता. दोन्ही अभिनेत्री पोलिसांसमोर अजून हजर झाल्या नसून दोघींनी अजून काही दिवसांची सवलत मागितली होती. जरी शर्लिन चोप्रा पोलीस चौकशीला समोर जात नसली तरी माध्यमांवर शर्लिन राज कुंद्रावर गंभीर आरोप करत असल्याची माहिती समोर येत होती. राज कुंद्राने पॉर्न फिल्मच्या व्यवसायात घुसवले आहे, असा दावा शर्लिनने केला आहे. पहिल्यांदा एका रोलची ऑफर केली त्यानंतर अश्लील कंटेंट बनवण्यास सांगितले, असे शर्लिनने माध्यामांना सांगितले आहे. आता शर्लिन चौकशीला कशी समोरे जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


हे हि वाचा – Raj Kundra pornography case: राज कुंद्राच्या जामीन अर्जावर १० ऑगस्टला होईल सुनावणी, पोलिसांना नोटीस जारी

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -