घरताज्या घडामोडीCoronavirus: ब्राझीलमध्ये कोरोनाचा हाहाकार; गेल्या २४ तासांत १९ हजार १५१ नवे रुग्ण!

Coronavirus: ब्राझीलमध्ये कोरोनाचा हाहाकार; गेल्या २४ तासांत १९ हजार १५१ नवे रुग्ण!

Subscribe

अमेरिका आणि रशियानंतर ब्राझीलमध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

जगात कोरोना विषाणू थैमान घालत आहे. दक्षिण अमेरिकेतील ब्राझील देश कोरोना संसर्गाचे नवे केंद्र होत असल्याचे दिसत आहे. या आठड्यात ब्राझीलमध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत ब्राझीलमध्ये १९ हजार १५१ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ८८८ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ब्राझीलमधील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा २ लाख ९१ हजार ५७९वर पोहोचला आहे. तर मृतांचा आकडा १८ हजार ८५९ झाला आहे. ब्राझीलमधील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्राझीलमधील प्रवास बंदीचा विचार करीत असल्याचे समोर आले आहे.

अमेरिका आणि रशियानंतर सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण ब्राझीलमध्ये आहे. देशात कोरोनाबाधित रुग्ण आढळण्यास सुरुवात झाल्यानंतर अनेक राज्यांनी लॉकडाऊन जारी केला आहे. देशातील कोरोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी मास्क घालणे अनिवार्य केले आहे. जर मास्क घातला नाही तर ५२ डॉलर्स दंड आकारला जात आहे.

- Advertisement -

जगात १२ देशांमध्ये एक लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत. अमेरिका, रशिया, ब्राझील, ब्रिटन, स्पेन, इटली, फ्रान्स, जर्मनी, टर्की, इराण आणि भारत असे हे बारा देश आहेत. अमेरिका, ब्रिटन, इटली, स्पेन, फ्रान्स या देशांमध्ये २५ हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. जगातील ५० लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली असून ३ लाख जणांचा मृत्यू झाला आहे.


हेही वाचा – Coroanavirus: जगात कोरोनाचा कहर सुरुच; कोरोनाग्रस्तांचा आकडा ५० लाखपार!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -