Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी दोन वर्षांच्या चिमुकलीचे वजन झाले ४५ किलो; डॉक्टरांनी केली बेरिएट्रिक शस्त्रक्रिया

दोन वर्षांच्या चिमुकलीचे वजन झाले ४५ किलो; डॉक्टरांनी केली बेरिएट्रिक शस्त्रक्रिया

Related Story

- Advertisement -

राजधानी दिल्लीत मुलांच्या शस्त्रक्रियेसंदर्भात एक दुर्मिळ घटना समोर आली आहे. दिल्लीत एका दोन वर्षांच्या चिमुकलीचे वजन ४५ किलो वाढले होते. वयोमानाप्रमाणे इतके वजन वाढल्यामुळे चिमुकलीच्या जीवाला धोका होता. त्यामुळे चिमुकलीवर मॅक्स रुग्णालयात बेरिएट्रिक शस्त्रक्रिया (Bariatric Surgery) करावी लागली. ही शस्त्रक्रिया खरंतर लहान मुलांवर केली जात नाही. परंतु धोका पत्करून डॉक्टरांनी या चिमुकलीवर बेरिएट्रिक शस्त्रक्रिया केली.

दिल्लीतील राहणारी दोन वर्षांची चिमुकली ख्याति वार्ष्णेयचे वजन ४५ किलो होते. ज्यानंतर मॅक्स रुग्णालयात शस्त्रक्रियेद्वारे तिचे वजन कमी केले गेले. याबाबत डॉक्टर म्हणाले की, ‘पहिल्यांदा शस्रक्रियेद्वारे ४० किलो वजन कमी केले गेले. त्यानंतर हळूहळू वजन अजून कमी होत राहिले.’ बेरिएट्रिक शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर विवेक बिंदल म्हणाले की, ‘यापूर्वी देशात अजून एक अशाप्रकारे प्रकरण समोर आले होते. ज्यात ११ महिन्यांच्या मुलीचे वजन वाढले होते. तिच्यावर देखील बेरिएट्रिक शस्त्रक्रिया करून तिला ठिक करण्यात आले होते.’

- Advertisement -

ख्याति वार्ष्णेयचे वडील म्हणाले की, ‘ख्यातिची आई ५० किलोची आहे आणि ख्याति स्वतः दोन वर्षांची असता ४० किलो झाली होती. जेव्हा ती ६ महिन्यांची होती, तेव्हापासून तिचे वजन वाढू लागले. ६ महिने झाल्यावर तिचे वजन २० किलो झाले होते.’ डॉक्टरांनी सांगितले की, ‘अशा प्रकरणात अनेक वेळा हळूहळू मुलांचे वजन वाढते आणि श्वास घेण्याची समस्या वाढू लागते. नंतर एक दिवस झोपतानाच श्वास थांबतो.’

मॅक्स रुग्णालयाचे डॉ. राजीव गुप्ता आणि डॉ. अरुण पूरी म्हणाले की, ‘ही खूप कठीण शस्त्रक्रिया होती. यामध्ये आम्हाला खूप समस्या आली. मुलीला औषधं किती द्यायचे. तिच्या वजनानुसार द्यायचे की वयानुसार द्यायचे. तसेच शस्त्रक्रियेदरम्यान श्वास घेण्याच्या क्षमता ठिक राहणे, खूप महत्त्वाचे होते. या प्रकरणात कोणताही निर्णय घ्यायचा असेल, त्या अगोदर आम्ही मिटिंग करत होतो. सर्वांनसोबत मिळून काम केले आणि आम्हाला यश मिळाले.’

- Advertisement -