घरCORONA UPDATECorona: गेल्या २४ तासांत देशात २,२९३ नवीन रुग्ण; महाराष्ट्रात सर्वाधिक!

Corona: गेल्या २४ तासांत देशात २,२९३ नवीन रुग्ण; महाराष्ट्रात सर्वाधिक!

Subscribe

देशात कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत आहेत. शनिवारी कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या ३७,३३६वर पोहोचली. त्याच वेळी, या संसर्गाने मृत्यू झालेल्यांची संख्या १,२१८ वर पोहोचली आहे, तर ९,९५० जण या संसर्गातून बरे झाले आहेत. गेल्या २४ तासांत २,२९३ नव्या रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात प्रथमच इतक्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या पाच दिवसांत दररोज १,५००हून अधिक रुग्णांची नोंद होत आहे.

२८ एप्रिल रोजी भारतात कोरोनाचे एकूण २९,४३५ रुग्ण आढळले आणि ९३४ रुग्णांचा मृत्यू झाला. एका दिवसात १,५४३ नवीन रुग्ण आढळले. त्याच वेळी, २४ तासांमध्ये ६२ रूग्ण संसर्गामुळे मरण पावले. २९ एप्रिल रोजी देशात संक्रमित रूग्णांची एकूण संख्या ३१,३३२ होती. यामध्ये गेल्या २४ तासांत १,८९७ रुग्णांची भर पडली होती आणि ७३ रुग्णांनी आपला जीव गमावला. ३० एप्रिल रोजी देशात संक्रमित रूग्णांची संख्या ३३,०५० वर पोहोचली. एका दिवसात १,७१८ नवीन रुग्ण सापडले. त्याच वेळी, गेल्या २४ तासात ६७ जणांना संसर्ग झाल्यामुळे मृत्यू झाला.

- Advertisement -

१ मे रोजी संक्रमित रूग्णांची संख्या ३५,०४३ वर पोहोचली. एका दिवसात १,९९३ नवीन रुग्णांची नोंद झाली आणि त्यात ७३ जण मरण पावले. त्याच वेळी, शनिवार २ मे पर्यंत कोरोनाने संक्रमित रुग्णांची संख्या ३७,३३६ वर पोहोचली. एका दिवसात म्हणजेच २४ तासांत सर्वाधिक २,२९३ रुग्ण आढळले.

- Advertisement -

म्हणजेच गेल्या पाच दिवसांत रुग्णसंख्येमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्याचबरोबर, लोकांचे आरोग्य सुधारण्याचे प्रमाणही वाढत आहे. आतापर्यंत देशात ९,९५० रूग्ण या आजारापासून पूर्णपणे बरे झाले आहेत. म्हणजेच २६.६४ टक्के रुग्ण या आजाराने बरे झाले आहेत. त्याचबरोबर, सरकार त्यांच्या वतीने शक्य ते सर्व करत आहे जेणेकरून संक्रमणाची प्रकरणे कमी होतील.

कोणत्या राज्यात किती प्रकरणे आहेत?

देशात सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रात आहेत. आतापर्यंत येथे ११,५०६ रुग्ण आढळले आहेत आणि ४८५ रुग्ण मरण पावले आहेत. आंध्र प्रदेशात १४६३, अंदमान आणि निकोबारमध्ये ३३, अरुणाचल प्रदेशात १, आसाममध्ये ४३, बिहारमध्ये ४७१, चंदीगडमध्ये ८८, छत्तीसगडमध्ये ४३, दिल्लीत ३७३८ आणि गोव्यात ७ प्रकरणे नोंदली गेली. मात्र, आता गोव्यातील सर्व रुग्ण बरे झाले आहेत. याशिवाय गुजरातमध्ये ४,७२१, मध्य प्रदेशात २७१९, राजस्थान २,६६६, तमिळनाडूमध्ये २५२६, उत्तर प्रदेशात २३२८ रुग्ण आढळून आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -