CoronaVirus: अमेरिकेतील मृतांचा आकडा पुन्हा वाढला; २४ तासांत २ हजार ५०२ जणांचे बळी!

गेल्या तीन दिवसांपूर्वी अमेरिकेतील मृतांच्या आकड्यात घट होताना दिसत होती. मात्र आता पुन्हा एकदा मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे.

2502 death in the last 24 hours in the united states of america
प्रातिनिधिक छायाचित्र

जगभरात कोरोनाचा विषाणूचा फैलाव झपाट्याने वाढत आहे. जगभरातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ३१ लाखांहून अधिक आहे. जगात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण अमेरिकेत सापडले आहेत. अमेरिकेत अजूनही कोरोनाचा कहर सुरूच आहे. गेल्या २४ तासांत अमेरिकेत २ हजार ५०२ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अमेरिकेतील एकूण मृतांचा आकडा ६१ हजारपार आहे. अमेरिका पाठोपाठ स्पेन, इटली, फ्रान्स, ब्रिटन या देशांतील देखील मृतांचा आकडा वाढत आहे. या जीवघेण्या कोरोनामुळे इटलीत २७ हजार ३५९ जणांचा मृत्यू, स्पेनमध्ये २३ हजार ८२२ जणांचा मृत्यू, फ्रान्समध्ये २३ हजार ६६० जणांचा मृत्यू आणि ब्रिटनमध्ये २१ हजार ६७८ जणांचा मृत्यू झाला आहे.

यापूर्वी अमेरिकेत मंगळवारी २ हजार २०७, सोमवारी १ हजार २०० तर रविवारी १ हजार जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे अमेरिकेतील मृतांचा आकड्यात घट होताना दिसत होत आहे. मात्र आता पुन्हा अमेरिकेतील मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे.

अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात कोरोना विषाणूने थैमान घातल आहे. न्यूयॉर्कमध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. अमेरिकेत वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, न्यूयॉर्कमध्ये आतापर्यंत ३ लाख ६ हजार १५८ कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले असून त्यापैकी ७ हजार ७७० जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांचा एकूण संख्या १० लाख ६४ हजार ५३३ आहे. तर मृतांचा आकडा ६१ हजार ६६८ आहे. अमेरिकेत आतापर्यंत १ लाख ४७ हजार ४११ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

जगातील कोरोनाग्रस्तांची संख्या ३१ लाख ४८ हजार ७४६ असून मृतांची संख्या २ लाख १८ हजार ३८५वर पोहोचली आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे आतापर्यंत ९ लाख ६२ हजार ५७१ जण रिकव्हर झाले आहेत.


हेही वाचा – ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांची प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल