घरCORONA UPDATELive update - गोव्यात २४ तासांत १,५०४ नव्या रुग्णांची वाढ, ३९ जणांचा...

Live update – गोव्यात २४ तासांत १,५०४ नव्या रुग्णांची वाढ, ३९ जणांचा मृत्यू

Subscribe

गोव्यात २४ तासांत १ हजार ५०४ नव्या रुग्णांची नोंद झाली असून ३९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १ हजार ५५७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. सध्या गोव्यात १५ हजार ६९९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

मागील २४ तासांत राज्यात २१ हजार २७३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ४२५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे आता राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५६ लाख ७२ हजार १८०वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ९२ हजार २२५ जणांचा मृत्यू झाला आहे. सविस्तर वाचा 

- Advertisement -

आज मुंबईत १ हजार २६६ नव्या रुग्णांची वाढ झाली असून ३६ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ८५५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईतील आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७ लाख २ हजार ५३२वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १४ हजार ७७८ जणांचा मृत्यू झाला असून ६ लाख ५७ हजार ३०१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सविस्तर वाचा 


मुंबईकरांनो, आजप्रमाणेच उद्याच्या लसीकरणाची नोंदणी देखील cowin.gov.in वर करणे अनिवार्य आहे. संबंधित विभाग लसीकरणाची माहिती जाहीर करतील. उद्या वॉक-इन सुविधा उपलब्ध नाही. दुसरा डोस घेण्याकरिता, कृपया पहिल्या डोससाठी वापरलेलाच संपर्क क्रमांक वापरा.


पदोन्नतीच्या मुद्द्यावर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झालेला नाही. मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. बैठकीत चर्चा करून पदोन्नती आरक्षणावर निर्णय होणार आहे.


चंद्रपूरमधील दारूबंदी उठवण्याचा राज्याच्या कॅबिनेटमध्ये निर्णय सविस्तर वाचा


गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावे हा राज ठाकरेंचाही मानस – छत्रपती संभाजी राजे,  गड किल्ल्यांचेही संवर्धन व्हायला हवे यासाठीही राज ठाकरेंची यांच्याशी एकमत


राज्यमंत्री मंडळ बैठकीला सुरुवात


यास चक्रीवादळाच्या प्रभावाचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांचा बंगाल आणि ओडिशा दौरा


उजनी धरणातील पाणी वळवण्याचा निर्णय रद्द, जलसंपदा विभागाकडून लेखी आदेश जारी


मराठा आरक्षण : छत्रपती संभाजी राजे हे मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीला कृष्णकुंजवर दाखल


तोक्ते चक्रीवादळादरम्यान झाड पडून दुर्दैवाने मृत्युमुखी पडलेल्या संगीता खरात यांच्या कुटुंबीयांना शासनातर्फे ४ लाखांची आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली.


पदोन्नती आरक्षण रद्दचा GR मागे घ्यावा- उर्जामंत्री नितीन राऊत


देशात सलग दुसऱ्या दिवशी नव्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ, तर ३८४७ जणांचा मृत्यू


शरद पवारांनी मराठा आरक्षणासाठी पुढाकार घ्या- संभाजीराजे


मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून खासदार संभाजीराजे घेणार शरद पवारांची भेट, पवारांच्या सिव्हर ओक बंगल्य़ावर ही बैठक सुरु होणार आहे.


लॉकडाउनबाबत राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वपूर्ण बैठक


मुंबई उपनगर, नवी मुंबईत मॉन्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसल्या


फायझरने लसींच्या वितरणासाठी पालिकाकडे मागितली आगाऊ रक्कम


भारतात मोनोक्लोनल अँटीबॉडी कॉकटेलने कोरोना रुग्णावर पहिल्यांदाच यशस्वी उपचार करण्यात आला आहे. गुरुग्रामच्या एका हॉस्पिटलमध्ये रुग्णाला मोनोक्लोनल अँटीबॉडी कॉकटेलचा डोस देण्यात आला.

 


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -