Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश ग्रेटर नोएडा एक्सप्रेसवेवर दोन बसची धडक; 3 प्रवासी ठार, 13 जखमी

ग्रेटर नोएडा एक्सप्रेसवेवर दोन बसची धडक; 3 प्रवासी ठार, 13 जखमी

Subscribe

नोएडा-ग्रेटर नोएडा एक्स्प्रेस वेवर नॉलेज पार्कजवळ दोन बसची रविवारी सकाळी भीषण धडक झाली. या अपघातात दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर 13 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. यातील दोन प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहचत जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले आहे. जखमींवर सध्या खासगी व शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

- Advertisement -

ग्रेटर नोएडा एक्स्प्रेस वेवरवरील नॉलेज पॉर्कजवळ रविवारी सकाळी दोन बसमध्ये ओव्हरटेक करताना दोन बसेसची समोरासमोर धडक झाली. यापैकी एक बस मध्य प्रदेशातील शिवपुरी येथून दिल्लीला जात होती आणि दुसरी बस प्रतापगडहून आनंद विहारकडे जात होती. या घटनेत आत्तापर्यंत तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्याचवेळी 13 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. यातील अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे काही एक्सप्रेस वेची वाहतूक देखील खोळंबली होती. मात्र आताही वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे.

पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवत तपास सुरु केला आहे. मृतांची ओळख अद्याप पटलेली असून त्यांच्या नातेवाईकांचा संपर्क शोधण्याचे प्रयत्न सुरु आहेत.


माजी कसोटीपटू दिलीप वेंगसरकरांवर अतिक्रमणाचा आरोप; मुंबई महापालिकेने बजावली नोटीस

- Advertisement -
- Advertisement -
sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -