घरदेश-विदेशBihar Storm : बिहारमध्ये वीज पडून 33 जणांनी गमावला जीव, पंतप्रधान मोदींनी...

Bihar Storm : बिहारमध्ये वीज पडून 33 जणांनी गमावला जीव, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दु:ख

Subscribe

वातावरणातील बदलांचा सर्वात मोठा हा बिहार राज्याला सहन करावा लागतोय. दरम्यान वीज कोसळून झालेल्या 33 मृतांमुळए आता बिहार प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे,

बिहारमध्ये 16 विविध जिल्ह्यांमध्ये वीज कोसळून 33 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. देव मृतांच्या कुटुंबीयांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो, असे ट्विट पंतप्रधानांनी केलं आहे. या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना बिहार सरकारने आर्थिक मदत जाहीर केली आहे. मृतांच्या कुटुंबियांनी प्रत्येकी चार लाख रुपयांची आर्थिक मदत देणार असल्याची घोषणा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केली आहे. (bihar due to storm lightning)

बिहारमध्ये अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. वादळाप्रमाणे झालेल्या पावसासह विजांच्या कडकडाटासह तब्बल 33 लोकांनी आपले प्राण गमावले. बिहारच्या 16 विविध जिल्ह्यांमध्ये या घटना घडल्या. याचा सर्वाधिक फटका बिहारच्या भागलपूर भागाला बसला, कारण एकट्या भागलपूर भागात वीज कोसळून सात जणांचा मृत्यू झाला, तर मुजफ्फरपूरमध्ये 6 जणांनी आपला जीव गमावला आहे.

- Advertisement -

पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त 

याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी देव शोकाकुल कुटुंबीयांना हे अपार दुःख सहन करण्याची शक्ती देवो. राज यसरकार स्थानिक प्रशासनाच्या मदतीने बचाव कार्य सक्रियपणे करत असल्याचे म्हटले आहे. दरम्यान मुसळधार पावसासह सुटलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे दाणादाण उडाली आहे.

- Advertisement -

दरम्यान बिहारमध्ये गुरुवारी वादळी वार, विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे भागलपूरमध्ये 7, मुझफ्फरपूरमध्ये 6, सारणमध्ये 3, लखीसरायमध्ये 3, मुंगेरमध्ये 2, समस्तीपूर, जेहानाबाद, खगरिया, नालंदा, पूर्णिया, बांका, बेगुसराय, अररिया, जमुई, कटिहारमध्ये 2 तर दरभंगामध्ये एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. या परिस्थितीत आपण पीडित कुटुंबियांच्या सोबत असल्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Bihar Chief Minister Nitish Kumar) यांनी म्हटले आहे. तसेच मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाखांची मदत आणि ज्यांच्या शेतीचे नुकसान झाले अशांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

बिहार प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा

वातावरणातील बदलांचा सर्वात मोठा हा बिहार राज्याला सहन करावा लागतोय. दरम्यान वीज कोसळून झालेल्या 33 मृतांमुळए आता बिहार प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे, तसेच खराब हवामानाच्या प्रसंगी आपत्ती व्यवस्थापन विभागाने केलेल्या सुचनांचे पालन करा, खराब हवामानात घरीच रहा आणि सुरक्षित रहा असे आवाहन मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केले आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी वादळ आणि वीज पडण्याच्या घटनेमुळे पिके आणि घरांच्या नुकसानीचा आढावा घेण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.


हेही वाचा : Nawab Malik Case : गोवावाला कंपाऊंडच्या व्यवहारात मलिकांचे डी गँगशी संबंध: ED च्या दोषापत्रानंतर कोर्टाचं निरीक्षण

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -