बिहारला वादळी पावसाचा तडाखा; 5 बोटींचे नुकसान, 25 जणांचा मृत्यू

राज्यात आता मान्सूनपूर्व पावसाला सुरूवात झाली. बिहारमध्ये झालेल्या पावासाचा फटका अनेक घरांना बसला आहे. तसंच, वादळी पावसामुळे हवामान केंद्राने यलो अलर्ट जारी केला आहे. शिवाय नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

बिहारमध्ये (Bihar) गुरूवारी वादळी वाऱ्यासह (thunderstorm) पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे पाटण्यातील मणेर येथे वाळू वाहून नेणाऱ्या पाच बोटी (boat) बुडाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच, विविध घटनांमध्ये 25 जणांचा मृत्यू झाला आहे. या वादळामुळे बिहारमधील नागरिकांच्या घरांचे नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसांत देशाच्या काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. बिहारप्रमाणेच आसाममध्येही (assam) मुसळधार पावसामुळे (heavy rainfall) पुरस्थिती निर्माण झाली आहे. शिवाय अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

बिहारच्या मुझफ्फरपूरमधील पाच, भागलपूरमधील चार, लखीसराय-सारणमधील प्रत्येकी तीन आणि मुंगेरमधील दोन आणि जमुई, बांका, बेगुसराय, खगडिया, पूर्णिया, नालंदा, जेहानाबाद आणि अररिया येथील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते. तसंच, पाटण्यात बुडालेल्या पाच बोटींमध्ये 50 मजूर होते. या मजूरांनी पोहून आपला जीव वाचवल्याचे समजते.

हेही वाचा – Assam Flood Crisis : आसाममध्ये पूरस्थिती गंभीर, 7 लाखांहून अधिक बाधित; 9 जणांचा मृत्यू

हवामानशास्त्रज्ञांच्या माहितीनुसरा, वातावरणातील आर्द्रता-समृद्ध हवेचा प्रवाह, तापमानातील वाढीमुळे वादळ आणि पाऊस झाला. राज्यात आता मान्सूनपूर्व पावसाला सुरूवात झाली. बिहारमध्ये झालेल्या पावासाचा फटका अनेक घरांना बसला आहे. तसंच, वादळी पावसामुळे हवामान केंद्राने यलो अलर्ट जारी केला आहे. शिवाय नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

आसाममधील पूरस्थिती दिवसेंदिवस गंभीर

आसाममधील पूरस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून गुरुवारी परिस्थिती आणखीनचं बिकट झाली, यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. दरम्यान राज्यातील 27 जिल्हे आणि तिथे राहणाऱ्या सुमारे 7.18 लाख स्थानिक नागरिकांना या पुराचा फटका बसला आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या दैनिक पुर अहवालानुसार, नागाव जिल्ह्यातील कांपूर महसूल क्षेत्रात बुडून एकाचा मृत्यू झाला. तर कामपूरमध्येही दोन जण बेपत्ता झाले आहेत. यासह राज्यात पूर आणि भूस्खलनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या आता दहाच्यावर पोहचली आहे. असेही अहवालात म्हटले आहे. प्राधिकरणाने म्हटले की, पुरामुळे राज्यात 7,17,500 हून अधिक लोक बाधित झाले आहेत.


हेही वाचा – Heavy Rainfall: केरळमधील ‘या’ सात जिल्ह्यांकरीता हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी