घरदेश-विदेशकॅलिफोर्नियामध्ये गोळीबारात 6 जणांचा मृत्यू, 17 वर्षीय आई अन् तिच्या सहा महिन्यांच्या...

कॅलिफोर्नियामध्ये गोळीबारात 6 जणांचा मृत्यू, 17 वर्षीय आई अन् तिच्या सहा महिन्यांच्या बाळाचाही मृत्यू

Subscribe

पोलीस अधिकारी बॉड्रॉक्स यांनी पत्रकारांना सांगितले की, आरोपींनी एका घरावर गोळीबार केला आणि त्यात सहा जणांचा मृत्यू झाला. याचा व्हिडीओ टुलारे काउंटी शेरिफ ऑफिस (TCSO) च्या फेसबुक पेजवर पोस्ट करण्यात आला आहे

वॉशिंग्टन : अमेरिकेतून पुन्हा एकदा गोळीबाराची घटना समोर आली आहे. कॅलिफोर्नियातील गोशेनमध्ये अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आहे. गोशेनमध्ये एका घरात झालेल्या गोळीबारात एका मुलासह सहा जणांचा मृत्यू झालाय. सोमवारी पहाटे मध्य कॅलिफोर्नियामध्ये गोळीबार झाला असून, पोलीस गोळीबार करणाऱ्या संशयितांचा शोध घेत आहेत. सोमवारी पहाटे 3:30 वाजता पूर्व व्हिसालिया येथील एका घरावर गोळीबार करण्यात आला, अशी माहिती तुलारे काउंटी शेरीफ कार्यालयाने दिली आहे. शेरीफ माईक बॉड्रॉक्स यांनी पत्रकारांना सांगितले की, परिसरात एक शूटर असल्याची माहिती मिळाली होती. (6 dead in California shooting 17 year old mother and her 6 month old baby also dead)

ड्रग्स टोळीचा सहभाग असल्याचा संशय
पोलीस अधिकारी बॉड्रॉक्स यांनी पत्रकारांना सांगितले की, आरोपींनी एका घरावर गोळीबार केला आणि त्यात सहा जणांचा मृत्यू झाला. याचा व्हिडीओ टुलारे काउंटी शेरिफ ऑफिस (TCSO) च्या फेसबुक पेजवर पोस्ट करण्यात आला आहे. मृतांमध्ये 17 वर्षांची आई आणि तिचे सहा महिन्यांचे बाळ आहे. हल्ल्यामागे हिंसाचाराचा मोठा हेतू असण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. तसेच या घटनेत ड्रग्स टोळीचा सहभाग असल्याचे मानले जात आहे.

- Advertisement -


पोलीस दोन संशयितांचा शोध घेत आहेत
टीसीएसओच्या फेसबुक पोस्टनुसार, या घटनेत किमान दोन संशयित आहेत. या कुटुंबाला जाणीवपूर्वक टार्गेट करण्यात आले असून, यात टोळ्यांचा हात असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर ही घटना अचानक घडलेली हिंसा नसल्याची बाब तपासात समोर आली आहे. या घटनेचा टोळीशी संबंध आहे. TCSO च्या फेसबुक पोस्टनुसार, किमान दोन संशयित असल्याची गुप्तहेरांनी माहिती दिली आहे. कुटुंबाला टार्गेट करण्यात आले असून, त्यात टोळ्यांचा सहभाग असल्याचे समजते. याशिवाय संभाव्य औषधाचाही तपास सुरू आहे.


हेही वाचाः दावोसमध्ये पहिल्याच दिवशी मिळाली ४५९०० कोटींची गुंतवणूक, ‘या’ पाच कंपन्या येणार महाराष्ट्रात

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -