Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी धक्कादायक! दिल्लीतील शास्त्री पार्कमधील एकाच घरात सापडले 6 मृतदेह

धक्कादायक! दिल्लीतील शास्त्री पार्कमधील एकाच घरात सापडले 6 मृतदेह

Subscribe

दिल्लीतील शास्त्री पार्क परिसरातील एकाच घरात ६ मृतदेह सापडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू झाला आहे. गुरूवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. मृतांमध्ये दीड वर्षाचे बालक, 15 वर्षांची मुलगी आणि एका 45 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

दिल्लीतील शास्त्री पार्क परिसरातील एकाच घरात ६ मृतदेह सापडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हे सर्वजण एकाच कुटुंबातील सदस्य आहेत. ते झोपेत असताना डासांपासून बचाव करण्यासाठी रात्रभर जाळण्यात आलेल्या औषधामुळे तयार झालेला कार्बन मोनॉक्साईड त्यांच्या शरीरात गेला. यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. नॉर्थ इस्ट दिल्लीच्या डीसीपींनी ही माहिती दिली आहे. (6 People Dead After They Inhaled Carbon Monoxide Produced By Burning Mosquito Repellant In Delhi)

मृतांमध्ये दीड वर्षाचे बालक, 15 वर्षांची मुलगी आणि एका 45 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच, भाजल्याने दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जगप्रवेश चंद्र रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील शास्त्रीपार्कमध्ये राहणाऱ्या एका घरात रात्री झोपताना डासांमुळे संरक्षण करण्यासाठी डास मारण्याची कॉईल लावण्यात आली होती. काही वेळाने ही कॉईल घरात झोपलेल्या माणसांच्या उशीवर पडली आणि आग लागली. कालांतराने ही आग वाढत गेली आणि घरातील लोकांना बचाव करणे कठीण झाले. त्यामुळे आगीच्या धुरात गुदमरुन चार जणांचा मृत्यू झाला. तसेच, दोन जणांचा आगीत भाजल्याने मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच, मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. सद्यस्थितीत पोलिसांनी घटनास्थळी अधिक तपासाला सुरूवात केली आहे. तसेच, पोलिसांना शवविच्छेदनाच्या अहवालाची प्रतिक्षा आहे. याप्रकरणी शास्त्री पार्क पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये चार पुरुषांचा, एका महिलेचा आणि एका मुलीचा समावेश आहे.

- Advertisement -

कार्बन मोनोऑक्साइड प्राणघातक का आहे?

कार्बन मोनोऑक्साइड वायू प्राणघातक आहे. हा वायू श्वासासोबत शरीरात गेल्यास व्यक्ती फिकट पडते. यामुळे पीडित व्यक्तीचा काही वेळात मृत्यूही होऊ शकतो. याशिवाय चक्कर येण्यासोबत अशक्तपणाही जाणवू लागतो. कोमा अवस्थेत, श्वसन अवयव निकामी झाल्यामुळे मृत्यू होतो.

वायूचे प्रमाण कमी असल्यास तणाव, अस्वस्थता, चक्कर येणे, अस्वस्थता याबरोबरच कानात मोठा आवाज येतो. मळमळ, स्नायू कमकुवत झाल्यामुळे चालण्यास त्रास होणे, दिसण्यास त्रास होणे, श्वास घेण्यास त्रास होणे इत्यादी त्याची लक्षणे आहेत.


हेही वाचा – दोन वेळचे जेवण मिळत नाही…; ७३ वर्षीय वडिलांनी संपवले जीवन, गुन्हा दाखल

- Advertisment -