घरदेश-विदेशदिल्लीमध्ये ६ वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार

दिल्लीमध्ये ६ वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार

Subscribe

६ वर्षाच्या चिमुरडीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेने राजधानी दिल्लीसह देश हादरून गेला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अजय नावाच्या नराधमाला अटक केली आहे. तर त्याचा तृतीयपंथी साथीदार मात्र फरार आहे.

राजधानी दिल्लीमध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ६ वर्षाच्या मुलीवर झालेल्या बलात्काराने दिल्ली हादरून गेली आहे. शनिवारी झालेल्या घटनेने राजधानी दिल्लीसह संपूर्ण देशामध्ये आता संतापाची लाट उसळली आहे. डीडीयु मार्गावरील मंदीराबाहेरून या ६ वर्षाच्या चिमुरडीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. अंत्यत चिंताजनक परिस्थितीमध्ये असलेल्या या चिमुरडीला जवळच्या रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर तिच्यावर ४ तासाची शस्त्रक्रिया करण्यात आली असून चिमुरडीची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती रूग्णालयाने दिली आहे. दरम्यान, या प्रकरणातील नराधमाला अटक करण्यात आली असून सहआरोपी असलेला तृतीयपंथी मात्र पसार झाला आहे. बलात्काराच्या घटनेने दिल्लीतील महिला किती सुरक्षित आहेत? हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चिला जात आहे.

अपहरण आणि बलात्कार

शनिवारी संध्याकाळी ६ वाजता चिमुरडी हरवल्याची तक्रार मुलीच्या वडीलांनी पोलीस ठाण्यात दाखल केले. चिमुरडीचे वडील दिल्लीमध्ये मानवचलित रिक्षा चालवतात. वडीलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मुलीचा शोध घ्यायला सुरूवात केली. यावेळी रात्री ११ वाजताच्या सुमारास घरापासून जवळच रस्त्याच्या बाजुला अत्यंत वाईट अवस्थेमध्ये ती सापडली. यावेळी तिच्या गुप्तांगामधून रक्तस्त्राव होत होता. त्यानंतर लगेचच तिला जवळच्या रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी चिमुरडीवर बलात्कार झाल्याचे सांगितले. त्यानंतर वेगाने सुत्र हालली. चिमुरडीने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी अजय नावाच्या नराधमाला अटक केली. तसेच या संपूर्ण प्रकरणामध्ये एका तृतीयपंथीयाचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्याचा शोध सुरू आहे.

- Advertisement -

सोमवारी दिल्लीच्या महिला पोलीस कमिशनर स्वाती मालीवाल यांनी देखील रूग्णालयामध्ये जाऊन ६ वर्षीय चिमुरडीच्या तब्येतीची विचारपूस केली. यानंतर त्यांनी या संपूर्ण प्रकरानंतर मी पूर्णपणे हादरून गेली आहे. माझ्या आयुष्यातील सर्वांत भयंकर प्रकरण असून मुलीच्या गुप्तांगाला इजा झाली आहे. नराधमांना कडक शिक्षा व्हावी अशी प्रतिक्रिया दिली. नराधमांना कडक शिक्षा होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला सुरक्षेसंदर्भात नुकताच मंजुर झालेला कायदा लागू करावा. जेणेकरून नराधमांना फाशीची शिक्षा करणे सोपे होईल. अशी प्रतिक्रिया दिली आहे.

चिमुरडीच्या घरची परिस्थिती हालाकीची

बलात्कार पीडित चिमुरडीच्या घरची परिस्थिती ही अंत्यत हालाकीची आहे. तिचे वडील मानवचलित रिक्षा चालक असून सावत्र आई तिचा सांभाळ करते. चिमुरडीचे स्वत:चे घर देखील नाही आहे. दरम्यान तिच्या तब्येतीमध्ये वेगाने सुधार व्हावा यासाठी सर्वत्र प्रार्थना केल्या जात आहेत.

- Advertisement -

वाचा – दिल्लीत एअर हॉस्टेसची आत्महत्या की हुंडाबळी?

वाचा – वासनांध! चौदा वर्षाच्या मुलीवर २ वेळा सामुहिक बलात्कार; ५ नराधम अटकेत

वाचा – ९९ वर्षीय वृद्धाने केला अल्प वयीन मुलीवर बलात्कार

वाचा – भाजप उपाध्यक्षांवर बलात्काराचा आरोप, दिला राजीनामा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -