घरट्रेंडिंगMaggi बनवणाऱ्या Nestle कंपनीचा धक्कादायक खुलासा! एकून तुम्हीही व्हाल चकित

Maggi बनवणाऱ्या Nestle कंपनीचा धक्कादायक खुलासा! एकून तुम्हीही व्हाल चकित

Subscribe

उत्पादनांमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत. मात्र आमचा पोर्टफोलिओ आरोग्याच्या दर्जांची पूर्तता करण्यासाठी सक्षम नाहीये.

मॅगी(Maggi) नूडल्स,किटकॅट,नेस्कॅफे यासारख्या जगप्रसिद्ध खाद्यपदार्थांची निर्मिती करणारी Nestly कंपनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण यावेळी नेस्लेनी त्यांच्या खाद्यपदार्थांविषयी धक्कादायक खुलासा केला आहे. नेस्ले कंपनी तयार करत असलेली ६० टक्के उत्पादने आरोग्याला अतिशय अपायकारक असल्याचा अहवाल नेस्ले कंपनीकडून पुढे आला आहे. या अहवालात कंपनीची ६० टक्के उत्पादने आरोग्यासाठी अपायकारक असल्याचे म्हटले आहे. ((60% products are harmful to health Shocking revelation of maggi maker Nestle company) या धक्कादायक खुलास्यामुळे सर्वच चकित झाले आहेत. बाजारात असलेले नेस्लेचे शेअर्सही (Nestly share) पडले आहे.

नेस्लेचे कोणतेही पदार्थ खाणे आणि पिणे आरोग्याच्या दृष्टीने चांगले नाही, असे ब्रिटनच्या फायनान्शिअल टाईम्सधील एका अहवालातून समोर आले आहे.  नेस्ले कंपनीने हे देखील मान्य केले आहे की, त्यांची काही उत्पादने कधीही आरोग्यासाठी निरोगी होणार नाहीत. फायनान्शिअल टाईम्सच्या मते २०२०च्या सुरुवातीला नेस्लेच्या उच्च कार्यकारी सादरीकरणात त्यांनी असे सांगितले होते की, कंपनीच्या केवळ ३७ टक्के उत्पादनांना ऑस्ट्रोलियाच्या हेल्थ स्टार रेटिंग सिस्टममध्ये ३.५ रेटिंग मिळाले होते.

- Advertisement -

कंपनीने आपले ६० टक्के उत्पादन अनहेल्दी असल्याचे सांगत असे म्हटले आहे की, आम्ही उत्पादने सुरक्षित करण्याचे काम करत आहोत. नेस्लेचे असे म्हणणे आहे की, त्यांनी आपल्या उत्पादनांमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत. मात्र आमचा पोर्टफोलिओ आरोग्याच्या दर्जांची पूर्तता करण्यासाठी सक्षम नाहीये. उत्पादनांची मागणी वेगाने वाढल्याने मागणी आणि नियामक दबावामुळे आम्हाला उत्पादनांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देता आले नाही.

फायनान्शिअल टाईम्सच्या अहवालानंतर नेस्लेने एक निवेदन जारी केले आहे. त्यात असे म्हटले आहे की, उत्पादनांमध्ये पोषण आणि आरोग्य धोरणांप्रमाणे करण्याचे काम आम्ही करत आहोत. उत्पादनांच्या पोर्टफोलिओमध्ये सुद्धा लोकांच्या गरजा पूर्ण करता येतील या उद्देशाने आम्ही कार्य करणार आहोत. आम्ही प्रयत्न करत आहोत. गेल्या दोन दशकांमध्ये आम्ही आमच्या उत्पादनांमध्ये साखर आणि सोडियमचे प्रमाण कमी केले आहे, असे नेस्लेने म्हटले आहे.

- Advertisement -

याआधीही नेस्लेच्या उत्पादनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. नेस्लेचे सर्वात लोकप्रिय उत्पादन असलेली मॅगीही वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. मॅगीमध्ये शिसं योग्य प्रमाणापेक्षा अधिक असल्याचे समोर आले होते. त्यामुळे मॅगीवरही २०१५मध्ये बंदी घालण्यात आली होती.


हेही वाचा – आपल्याकडची ५०० ची खरी नोट ओळखायची कशी? RBI ने सांगितली सोपी पद्धत

 

 

 

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -