karnataka Road Accident : कर्नाटकच्या हुबळीमध्ये भीषण रस्ते अपघात; 7 जणांचा मृत्यू, 27 जखमी

7 killed 27 injured in a accident in hubli karnataka
karnataka Road Accident : कर्नाटकच्या हुबळीमध्ये भीषण रस्ते अपघात; 7 जणांचा मृत्यू, 27 जखमी

कर्नाटकच्या हुबळीमध्ये आज भीषण रस्ते अपघात घडला आहे. प्रवासी बस आणि लॉरी यांच्यात झालेल्या या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 26 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर KIMS रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सोमवारी रात्री हा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की यात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. पोलिसांनी घटनेची माहिती दिली. (Karnataka Road Accident)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवासी बस कोल्हापूरहून बंगळुरूकडे  (Kolhapur To Bengluru Bus) जात होती. यावेळी कर्नाटकच्या हुबळी शहराच्या बाहेर रात्री 12:30 ते 1 वाजण्याच्या सुमारास या प्रवासी बस आणि लॉरी यांच्यात जोरदार धडक झाली. या धडकेत 7 जण ठार तर 26 जखमी झाले. धारवाडकडे जाणाऱ्या लॉरीला बसची धडक बसली (Collision Between Bus And Lorry) तेव्हा बसचालक ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होता.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होत एफआयआर नोंदवला आहे. या अपघातातील मृतांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. सध्या पुढील तपास सुरू आहे.

अपघाताचे प्रमाण वाढले

याआधीही कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यात आणखी एक रस्ता अपघात झाला होता, ज्यामध्ये ७ जणांचा मृत्यू झाला होता. भरधाव वेगात असलेल्या कारचा तोल सुटून झाडावर आदळल्याने हा अपघात झाला. लग्न आटोपून सर्व लोक गावी परतत होते. या अपघातात 10 जण जखमीही झाले आहेत.


QUAD Summit 2022 : जपानी मुलाचे हिंदी ऐकून PM मोदी झाले अचंबित, विचारला ‘हा’ प्रश्न