घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटबापरे! दुसऱ्या लॉकडाऊननंतर या देशात झालं ७०० किमी ट्रॅफिक जाम!

बापरे! दुसऱ्या लॉकडाऊननंतर या देशात झालं ७०० किमी ट्रॅफिक जाम!

Subscribe

जगभरात गेल्या ८ ते ९ महिन्यांपासून कोरोनाचं थैमान सुरू आहे. चीन, अमेरिका आणि नंतर युरोपात कोरोनानं मोठ्या प्रमाणावर हातपाय पसरले होते. मात्र, वेळीच लॉकडाऊन लागू केल्यामुळे युरोपात अनेक देशांमध्ये कोरोना नियंत्रणात आल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र, आता युरोपातल्या या देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे फ्रान्स, जर्मनी आणि ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्याची वेळ तिथल्या सरकारांवर ओढवली आहे. नुकताच फ्रान्समध्ये कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू केल्यामुळे तिथे वेगळीच समस्या निर्माण झाली. फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रो इमॅन्युएल यांनी लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर काही तासांतच फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये प्रचंड ट्रॅफिक जाम झालं. प्रत्यक्षदर्शी आणि काही निरीक्षकांच्या मते, हे ट्रॅफिक तब्बल ७०० किलोमीटर इतकं लांब होतं!

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रो इमॅन्युएल यांनी देशात दुसऱ्यांदा लॉकडाऊन लागू करण्याची घोषणा केली. हा लॉकडाऊन येत्या १ डिसेंबरपर्यंत म्हणजेच अजून एक महिना लागू राहील, असं देखील सांगण्यात आलं. मात्र, इमॅन्युएल यांच्या या घोषणेनंतर पॅरिस आणि आसपासच्या भागात प्रचंड ट्रॅफिक जाम झाल्याचं दिसून आलं. घरगुती आवश्यक गोष्टींच्या खरेदीसाठी फ्रान्समधील जनता मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडली होती. त्यामुळेच हा ट्रॅफिक जाम झाल्याचं सांगितलं जात आहे.

- Advertisement -

२४ तासांत फ्रान्समध्ये ३५ हजार नवे रुग्ण

फ्रान्समध्ये गेल्या ७ महिन्यात दुसऱ्यांदा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यादरम्यान, लोकांच्या बाहेर फिरण्यावर निर्बंध लादण्यात आले आहेत. मात्र, अत्यावश्यक काम, आरोग्यविषयक आणीबाणी अशा गोष्टींसाठी घराबाहेर पडण्याची परवानगी लोकांना देण्यात आली आहे. तसेच, घराजवळ व्यायामाला जाण्याची देखील परवानगी देण्यात आली आहे. दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये फ्रान्समध्ये शाळा आणि बहुतेक उद्योगधंदे सुरू राहणार आहेत. गेल्या २४ तासांमध्ये फ्रान्समध्ये ३५ हजारहून जास्त कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे फ्रान्समध्ये कोरोनाबाधितांचा आकडा १४ लाख १२ हजारहून जास्त झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -