घर ताज्या घडामोडी Muzaffarnagar Durgs Case : मुझफ्फरनगरमध्ये ९०० कोटींचे ड्रग्ज जप्त, शाहीन बागमधून अटक...

Muzaffarnagar Durgs Case : मुझफ्फरनगरमध्ये ९०० कोटींचे ड्रग्ज जप्त, शाहीन बागमधून अटक झालेल्या हैदरशी कनेक्शन काय?

Subscribe

एटीएसने शाहीन बाग येथून अटक केलेल्या ड्रग्ज तस्कर हैदरशी निगडीत यूपीतील मुझफ्फरनगर येथील अड्ड्यावरून १५० किलोहून अधिक हेरॉईन जप्त केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची किंमत तब्बल ९०० कोटी रूपये इतकी आहे. हैदरला एनसीबीने शाहीन बाग येथील त्याच्या राहत्या घरातून अटक केली होती. त्याच्या घरातून ३०० कोटी रूपये किंमतीचे ५० किलो हेरॉईन, ३० लाख रोकड आणि ४७ किलो इतर अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते.

- Advertisement -

गुजरात एटीएसनं हैदरच्या मुझफ्फरनगर येथील घराच्या शेजाऱ्याच्या घरावर छापा टाकला आणि तब्बल १५० किलो हेरॉइन जप्त केलं. एनसीबीचे डीडीजी ज्ञानेश्वर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार ड्रग्ज प्रकरणात लक्ष्मीनगरमधून हवाला व्यापारी शमीम याला अटक केली आहे.

- Advertisement -

अटारी बॉर्डर आणि गुजरातमध्ये जे हेरॉइन जप्त करण्यात आलं आहे. त्या सर्वांचा सोर्स एकच असल्याचं ज्ञानेश्वर सिंह यांनी म्हटलं आहे. यासाठी गुजरात आणि अटारी बॉर्डरवर पकडण्यात आलेल्या आरोपींचीही चौकशी करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

एनसीबीने दिल्लीच्या शाहीन बाग परिसरातून याआधी ५० किलो हेरॉइन जप्त केलं होतं. याशिवाय ३० लाख रोकड, नोटा मोजण्याचं मशीन आणि काही किलो इतर अंमली पदार्थ जप्त केले होते. या हेरॉइनची किंमत ४०० कोटी रुपये सांगण्यात येत आहे. गुजरातच्या किनारपट्टीवरही एटीएसने हेरॉईनची मोठी खेप पकडल्याचे सांगण्यात येते. यात हैदरचे नावही समोर आले. सिटी कोतवाल आनंद देव मिश्रा यांनी सांगितले की, शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास किडवाईनगरमध्ये एटीएसने छापा टाकला.


हेही वाचा : IPL 2022: तुम्ही मला पिवळ्या जर्सीत बघाल पण..,आगामी वर्षात आयपीएल खेळण्याबाबत धोनीचं मोठं वक्तव्य


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -