घरदेश-विदेशझारखंडमध्ये खासगी रुग्णालयात भीषण आग, संचालकांसह सहा जणांचा मृत्यू

झारखंडमध्ये खासगी रुग्णालयात भीषण आग, संचालकांसह सहा जणांचा मृत्यू

Subscribe

धनबाद – टेलिफोन एक्सचेंज रोड येथील सीसी हाजरा मेमोरिअल येथे मध्यरात्री आग लागली होती. या आगीत दोन डॉक्टरांसह सहा लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, या रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या नऊ रुग्णांना वाचवण्यात यश आले आहे. दरम्यान, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आगीची माहिती कळताच रुग्णालयातील रुग्ण आणि आजूबाजूचे लोकांमध्ये गोंधळ निर्माण झाला. घटनेची माहिती मिळता आमदार राज सिन्हा, भाजपा नेता रागिनी सिंह, विजय झा आदी घटनास्थळी पोहोचले.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांनी रुग्णालयातील नऊ रुग्णांना बाहेर काढले. या सर्वांना जवळच्या पाटलीपूत्र नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले. रुग्णालयात आग प्रतिबंधक उपाययोजना नसल्याने आग नियंत्रणात आणण्यास कठीण गेले. एंटीफायर मशीनसुद्ध सक्रीय नव्हती.

- Advertisement -

डॉ. विकास आणि डॉ. प्रेमा रुग्णालयातील तेथील दुसऱ्या मजल्यावर झोपले होते. मात्र, आग लागल्याचं कळताच स्वतःचा बचाव करण्याकरता त्यांना वेळच मिळाला नाही. त्यांनी बाथरुममधील पाण्याचा फवारा करून आग विझवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा प्रयत्न असफल ठरला. अखेर डॉ. विकास आणि डॉ. प्रेमा यांचा मृत्य झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -