घरदेश-विदेशआइस्क्रीम बनवणाऱ्या 'या' कंपनीने घातला ९ बँकांना गंडा; CBI चे ८ ठिकाणी...

आइस्क्रीम बनवणाऱ्या ‘या’ कंपनीने घातला ९ बँकांना गंडा; CBI चे ८ ठिकाणी छापे, गुन्हा दाखल

Subscribe

क्वॉलिटी लिमिटेड या कंपनीवर बँक ऑफ इंडियाच्या अंतर्गत असलेल्या बँकांच्या गटांनी तक्रार दाखल केली होती.

आइस्क्रीम उत्पादन क्षेत्रात लोकप्रिय असलेल्या क्वॉलिटी वॉल्स लिमिटेडमध्ये तब्बल १४०० कोटींचा आर्थिक घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणी आता सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. क्वालिटी वॉल्स आईस्क्रीम्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या या कंपनीतील दिल्लीच्या मुख्य कार्यालयाबरोबरच एकूण आठ ठिकाणी छापे मारण्यात आले. या कंपनीने नऊ बँकांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप केला जात आहे. या बँकांची कंपनीने १४०० कोटींची फसवणूक करुन आर्थिक घोटाळा केल्याच्या संक्षयावरुन हे छापे टाकण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. यासंदर्भातील वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

छापे टाकून सीबीआयने केले कागदपत्रं जप्त

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी आठ ठिकाणी छापे टाकून सीबीआयने कागदपत्रं जप्त केली आहेत. छापे टाकण्यात आलेल्या ठिकाणांमध्ये दिल्ली, सहारणपूर, बुंदेशहर (उत्तर प्रदेश), अजमेर (राजस्थान,) पवाल (हरयाणा) या ठिकाणांचा समावेश आहे. या ठिकाणी असणारी कंपनीची कार्यालये आणि इतर ठिकाणांवर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले.या प्रकरणामध्ये सीबीआयने क्वालिटी लिमिटेड कंपनी आणि कंपनीचे संचालक संजय डिंग्रा, सिद्धार्थ गुप्ता, अरुण श्रीवास्तव यांच्याबरोबर अन्य काही व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

बँकांना घातला १४०० कोटींचा गंडा

सीबीआयचे प्रवक्ते आर. के. गौर यांनी  असे सांगितले की, “आमच्याकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये बँक ऑफ इंडियाबरोबरच या कंपनीने कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदरा, आंध्रा बँक, कॉर्परेशन बँक, आयडीबीआय बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, धनलक्षमी बँक आणि सिंडिकेट बँकेला एकत्रितपणे १ हजार ४०० कोटी ६२ लाखांचा (अंदाजे) गंडा घातला आहे,”

बँकांनीच आरोप केल्याने CBI कडून गुन्हा दाखल

बँकेचा पैसा हा इतर खात्यात वळवणे, बनावट कागदपत्रे, खोटी बिलं तयार करणे आणि खोटी संपत्ती दाखवण्याचा गैरव्यवहार झाल्याचा बँकांनी म्हटले आहे. यामध्ये क्वॉलिटी लिमिटेड या कंपनीवर बँक ऑफ इंडियाच्या अंतर्गत असलेल्या बँकांच्या गटांनी तक्रार दाखल केली होती.

- Advertisement -

कॅनरा बँक, आंध्र बँक, बँक ऑफ बडोदा, कॉर्पोरेशन बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, धनलक्ष्मी बँक, सिंडिकेट बँक यांचा समावेश आहे. तर बँकांनीच आरोप केल्यामुळे सीबीआयने अखेर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे सीबीआयने देशभरातील क्वालिटी लिमिटेडच्या कार्यालयावर छापे मारण्याचे काम सुरू केले आहे.


आज आहे World Rose Day, पण का साजरा करतात हा दिवस? वाचा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -