घरदेश-विदेशपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कधीही मदत घेतली नाही - अब्बास अली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कधीही मदत घेतली नाही – अब्बास अली

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आई हिराबेन मोदी यांच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त एक खास ब्लॉक लिहिला होता. आईचा वाढदिवस खास बनवण्यासाठी पंतप्रधानांनी ब्लॉगच्या माध्यमातून काही आठवणी शेअर केल्या होत्या. त्यात पंतप्रधान मोदी यांचे बालपणीचे मुस्लिम मित्र अब्बास याच्याबद्दल आठवण लिहिली होती. वडिलांचा एक जवळचा मित्र बाजूच्या गावात राहत होता. मित्राच्या अकाली मृत्यूनंतर वडिलांनी मित्राचा मुलगा अब्बासला आमच्या घरी आणले होते. आमच्या सोबत राहून त्याने शिक्षण पूर्ण केले, असे प्रंतप्रधान मोदींनी ब्लॉकमध्ये लिहीले होते. यानंतर अब्बास यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

कोण आहेत अब्बास –

- Advertisement -

पंतप्रधान मोदींच्या ब्लॉगनंतर अब्बास नेमके कोणे यावर सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली होती. दरम्यान अब्बास आली यांच्याशी एका खासगी वृत्त वाहिनीने संपर्क साधला. वडील आणि मोदींच्या वडिलांची मैत्री होती. 4 किलोमीटर अंतरावर त्यांचे गाव होते. वडिलांच्या मृत्यूनंतर एक वर्ष ते पंतप्रधान मोदी यांच्या वडिलांच्या घरी राहिले. मोदींच्या वडिलांनीच अब्बास यांना आपल्या घरी आणले होते. तिथूनच ते मॅट्रिक पास झाले.

अब्बास नेमके काय म्हणाले –

- Advertisement -

यावेळी आम्ही त्यावेळी होळी, दिवाळी, ईद एकत्र साजरी करायचो. मोदी यांच्या मातोश्री ईदवेळी सेवई बनवायच्या. आज जसे वातावरण आहे तसे आधी नव्हते. होळी, दिवाळी एकत्र सेलिब्रेट करायचो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कधीही मदत घेतली नाही. अहमदाबाद मध्ये राहत असून कधी भेटलो नाही. मोदी यांच्याशी कमीत कमी भेट झाली, असे ते म्हणाले.

ब्लॉगमध्ये मोदी काय म्हणाले –

आईला इतर लोकांच्या आनंदात आनंद मिळत असे आणि ती खूप मोठ्या मनाची होती असे पंतप्रधान मोदींनी आपल्या ब्लॉगमध्ये नमूद केले होते. “वडिलांचा एक जवळचा मित्र बाजूच्या गावात राहायचा. त्यांच्या अकाली मृत्यूनंतर, वडिलांनी त्यांच्या मित्राच्या मुलाला, अब्बासला आमच्या घरी आणले. आमच्यासोबत राहून त्याने शिक्षण पूर्ण केले. आई आम्हा सर्व भावंडांप्रमाणेच अब्बासची प्रेमाने काळजी घ्यायची. दरवर्षी ईदच्या दिवशी ती त्याच्या आवडीचे पदार्थ बनवत असे याची आठवण त्यांनी सांगितली. सणासुदीला, आजूबाजूची मुले आमच्या घरी यायचे आणि आईच्या हातच्या खास पदार्थांचा आस्वाद घ्यायचे असेही त्यांनी नमूद केले .”

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -