घरCORONA UPDATEमुस्लिमांना वेगळे पाडण्याचा प्रयत्न, आरोप करणारे मौलाना क्वारनटाईनमध्ये

मुस्लिमांना वेगळे पाडण्याचा प्रयत्न, आरोप करणारे मौलाना क्वारनटाईनमध्ये

Subscribe

दिल्लीतील निजामुद्दीन मरकज येथील तबलिगी जमात मेळाव्यात सरकारवर मुस्लिमांना वेगळे पाडण्याचा आरोप करणारे मौलाना साद यांचा एक ऑडिओ समोर आला आहे. यात कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून त्यांनी स्वतला क्वारनटाईन केल्याचे ते सांगत आहेत. आजच हा ऑडिओ व्हायरल झाला आहे.

यात मौलाना यांनी तबलिगी जमातीमधील लोक जेथे कुठे असतील त्यांनी सरकारच्या सूचनांचे पालन करावे असे सांगत आहेत. देशात ल़ॉकडाऊन जाहीर झालेला असतानाही निजामुद्दीन मरकज येथे तबलीगी जमातीच्या लोकांचा मेळावा घेण्यात आला होता. या मेळाव्यात मुस्लिमांनी सहभागी होऊ नये व त्यांना वेगळे करण्याचा सरकार घाट घालत असल्याचा आरोप मौलाना साद यांनी केला होता. यामुळे मौलाना यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत देश विदेशातून ५ हजाराहून अधिक तबलिगी जमातीचे लोक या मेळाव्यात सहभागी झाले.

- Advertisement -

नंतर यातील अनेकजण आपआपल्या गावीही गेले. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या दिल्ली पोलिसांनी सरकारच्या आदेशाची पायमल्ली करणाऱ्या मौलाना विरोधात गुन्हा नोंदवला व या मेळाव्यात सहभागी झालेल्यांचा देशभरात शोध सुरु केला आहे. यातील अनेकजणांचा विविध राज्यात अत्तापत्ता भेटल्याने त्यांना क्वारनटाईन करण्यात आले आहेत.

पण लॉक़डाऊन व कोरोनाच्या संसर्गाच्या भीतिच्या नावाखाली मुस्लिमांना वेगळे करण्याचा आरोप करणाऱ्या मौलानाच क्वारनटाईनमध्ये असल्याचे ऑडिओमध्ये समोर आल्याने तबलिगी जमातीबरोबरच अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान या ऑडिओची फॉरेन्सिक तपासणी केली जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -