Adani Group ची आता आरोग्य क्षेत्रात एन्ट्री; ‘ही’ सरकारी कंपनी घेणार विकत

Adani group enters in health care after cement company acquisition
Adani Group ची आता आरोग्य क्षेत्रात एन्ट्री; ही या सरकारी कंपनीला घेणार विकत

आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि अदानी समूहाचे मालक सिमेंट क्षेत्रानंतर आता आरोग्य क्षेत्रात एन्ट्री घेणार आहेत. अदानी देशातील मोठ्या हॉस्पिटल्स, डायग्नोस्टिक चेन आणि ऑफलाईन आणि डिजिटल फार्मासीच्या अधिग्रहणाद्वारे आरोग्य क्षेत्रात प्रवेश करणार आहेत. यासाठी अदानी समूह एका नवीन कंपनीची स्थापना करणार आहे.
समूहाच्या बिझनेस इनक्यूबेटर फर्म अदानी एंटरप्राइजेस लिमिटेडने एक नियामक फाइलिंगमध्ये म्हटले की, अदानी समूहाने 17 मे 2022 रोजी त्यांची पूर्ण मालकीची उपकंपनी अदानी हेल्थ व्हेंचर्स लिमिटेड (AHVL) सुरु केली आहे.

हेल्थ व्हेंचर्स लिमिटेड (AHVL) हीच कंपनी आता अदानी समूहाच्या आरोग्य क्षेत्रासंबंधीत बाबींवर निर्णय घेणार आहे. यामध्ये इतर गोष्टींबरोबर, वैद्यकील आणि डायग्नॉस्टिक्स सुविधा, ऑपरेशन, प्रशासन, आरोग्यासंबंधीत मदत, आरोग्य तंत्रज्ञान- आधारित सुविधा, संसोधन केंद्र आणि इतर सर्व संलग्न आणि आपत्कालीन क्रिया प्रक्रियांचा समावेश आहे.

एएचव्हीएलने सांगितले की, ते योग्य वेळी आपला व्यवसाय सुरु करतील, बंदरांपासून विमानतळ आणि उर्जेपर्यंत व्यवसाय चालवणाऱ्या या समूहाने एकूण 10.5 अब्ज डॉलर्सच्या स्विस सिमेंट निर्मात्या हॉल्सिमच्या इंडिया ऑपरेशन्सच्या माध्यमातून सिमेंट क्षेत्रात प्रवेश केला.

आता आरोग्य क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी समूह या क्षेत्रातील बड्या कंपन्यांशी चर्चा करत आहे. 4 बिलियन डॉलरपर्यंत हा व्यवहार होऊ शकतो. दरम्यान पिरामल हेल्थकेअर ही कंपनी आता सार्वजनिक क्षेत्रातील फार्मास्युटिकल फर्म HLL Lifecare Ltd (HLL) कंपनी खरेदी करण्याच्या तयारीत आहे. डिसेंबर 2021 मध्ये सरकारने कंपनीतील 100 टक्के हिस्सेदारी खाजगी संस्थांना विकण्याचा निर्णय घेतला होता. या कंपनीसाठी सात वेळा बोली लागली.