Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश Tamil Nadu: तब्बल ४६६ उमेदवार आरोपी, ६५२ कोट्याधीश तर एकाची एकूण संपत्ती...

Tamil Nadu: तब्बल ४६६ उमेदवार आरोपी, ६५२ कोट्याधीश तर एकाची एकूण संपत्ती २६४ कोटींहून अधिक!

वाचा सविस्तर..काय सांगतो अहवाल

Related Story

- Advertisement -

देशात पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ या चार राज्यांसह पद्दुचेरी या एका केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणुकांना सुरूवात झाली असून तामिळनाडू राज्यात 6 एप्रिल रोजी 234 जागांसाठी मतदान होणार आहे. दरम्यान, एडीआरने तामिळनाडू विधानसभा निवडणुका 234 मतदारसंघातून लढविणार्‍या 3998 पैकी 3559 उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांचे सखोल विश्लेषण केले आहे. 3559 उमेदवारांपैकी २०२ उमेदवार राष्ट्रीय पक्षांकडून, 489 राज्य पक्षांचे, 1011 मान्यता नसलेल्या पक्षांचे तर 1867 उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आहेत. यासह तामिळनाडूतील किती उमेदवार करोडपती आहेत? किती उमेदवारांवर फौजदारी खटले दाखल झाले आहेत? आणि ते कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित आहेत? याचे विश्वलेषण देखील या अहवालात करण्यात आले आहे.

तब्बल 466 उमेदवार कलंकित

एडीआरच्या अहवालानुसार, 3559 पैकी 466 म्हणजे 13टक्के उमेदवारांनी स्वत: वर फौजदारी खटले जाहीर केले आहेत. सहा टक्के म्हणजेच 207 उमेदवारांनी स्वतःवर गंभीर गुन्हेगारी प्रकरणांची नोंदविल्याचे सांगितले. द्रमुककडे 178 पैकी 136 म्हणजेच 76 टक्के, एआयएडीएमके 191 पैकी 46 म्हणजे 24 टक्के, डीएमडीके 60 पैकी 18 म्हणजे 30 टक्के, भाजपा 20 पैकी 20 म्हणजे 75 टक्के, कॉंग्रेस 21 पैकी 15 आहेत., पाटली मक्कल कच्छीच्या 23 पैकी 10, माकपच्या 5 पैकी 3, सीपीआयच्या 4 पैकी 50 टक्के आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 5 पैकी एका उमेदवारांनी स्वत: वर फौजदारी गुन्हे दाखल झाल्याची माहिती प्रतिज्ञापत्रात दिली आहे.

207 उमेदवारांवर गंभीर गुन्हे दाखल

- Advertisement -

यासोबतच, 207 उमेदवारांनी त्यांच्यावर गंभीर फौजदारी गुन्हे दाखल झाले असे जाहीर केले आहेत. द्रमुकच्या 178 पैकी 50, एआयएडीएमकेच्या 191 पैकी 18, भाजपाच्या 20 पैकी 8, कॉंग्रेसमधील 21 पैकी 6, पाटली मक्कल कच्छीच्या 23 पैकी 5 उमेदवारांनी त्यांच्यावर गंभीर फौजदारी गुन्ह्यांची नोंद झाल्याची माहिती दिली आहे.

काँग्रेसचे 91 टक्के उमेदवार कोट्याधीश

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत 652 उमेदवार कोट्याधीश आहेत. कॉंग्रेसच्या 21 पैकी 19, द्रमुकच्या 178 पैकी 155, एआयएडीएमकेच्या 191 पैकी 164, भाजपापैकी 20 पैकी 15, डीएमडीकेच्या 60 पैकी 19, पाटली मक्कल कच्छीच्या 23 पैकी 14 आणि 4 पैकी 1 उमेदवार करोडपती आहेत. तामिळनाडू विधानसभा निवडणुका 2021 मधील उमेदवारांची सरासरी मालमत्ता 1. 72 कोटी रुपये असल्याचे देखील सांगितले जात आहे.


Assembly Election 2021: बंगालच्या ‘वाघिणी’ला शरद पवारांच्या एका पत्रामुळे मिळालं बळ

- Advertisement -