घरताज्या घडामोडीकाबुल एअरपोर्टवर पाण्याची बॉटल ३ हजारांना, राईस प्लेट ७ हजार ५०० रूपयांना

काबुल एअरपोर्टवर पाण्याची बॉटल ३ हजारांना, राईस प्लेट ७ हजार ५०० रूपयांना

Subscribe

अफगाणिस्तनात तालिबानी दहशतवाद्यांनी केलेल्या कहरामुळे काबुल एअरपोर्टवर अत्यंत भयावह अशी परिस्थिती आहे. नागरिकांमध्ये इतकी दहशत आहे की, अनेक नागरिकांवर आपले सामान सोडूनच देश सोडण्याची वेळ आली आहे. पण सर्वात गंभीर म्हणजे सध्या काबुल एअरपोर्ट नागरिकांचे मोठ्या प्रमाणात खाण्यापिण्याचे हाल होत आहेत. अनेक नागरिकांवर एअरपोर्टवर मिळणाऱ्या महागड्या सुविधांमुळे उपासमारीची वेळ आली आहे. प्यायला पाणी नाही, खायला अन्न नाही अशा परिस्थितीत नागरिकांना काबुल एअरपोर्टवर सध्या दिवस काढावा लागत आहेत. काबुल एअरपोर्टवर परिस्थिती इतकी वाईट आहे की, नागरिकांना एक पाणी बॉटलसाठी ४० डॉलर म्हणजे ३ हजार रूपये मोजावे लागत आहेत. तर एका राईस प्लेटसाठी १०० डॉलर म्हणजे ७ हजार ५०० रूपये मोजण्याची वेळ आली आहे. त्याहून भयानक म्हणजे अफगाणिस्थानातील चलनातील नोटांचाही स्विकार केला जात नसल्याने नागरिकांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. एअरपोर्टवर फक्त डॉलर्स स्विकारले जात असल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. (Afganistan kabul airport situation worsen, water bottle sold for 3000 rupees, rice plate for 7500 rupees)

देश सोडून जाण्यासाठी एअरपोर्टवर नागरिकांकडून उपाशीपोटीच रांगेत उभे राहण्याची नामुष्की ओढावली आहे. अशातच सर्वाधिक हाल होत आहेत, ते म्हणजे छोट्या मुलांचे. सध्या काबुल एअरपोर्टवर ५० हजारांहून अधिक लोक हे देश सोडण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे एअरपोर्टपोर्ट पोहचण्यासाठी अतिशय भयानक अशी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. अनेकांना या वाहतूक कोंडीमुळेच एअरपोर्ट गाठणेही कठीण झाले आहे. त्यातच एअरपोर्टवर महागलेल्या गोष्टींमुळे नागरिकांच्या गैरसोईत आणखी भर पडत आहे.

- Advertisement -

अफगाणिस्तानातील नागरिकांना रनवेवर मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. काही जणांनाच एअरपोर्टवर जाण्याची परवानगी मिळाली आहे. पण अनेक लोक हे एअरपोर्टच्या बाहेरच प्रवेशासाठीची वाट पाहत आहेत. त्यामुळे एअरपोर्ट परिसरात लांबच लांब अशा रांगा लागल्या आहेत. आपल्याला रांगेत प्रवेशाची संधी कधी मिळेल या आशेवरच अनेक लोकांची गर्दी सध्या काबुल एअरपोर्टच्या बाहेरदेखील जमा झाली आहे. अनेकांचा नाईलाज असल्यानेच रांगेत प्रतिक्षेत थांबण्याशिवाय सध्या कोणताही पर्याय नागरिकांपुढे नाहीए. तर दुसरीकडे एअरपोर्टवर पोहचूनही पाण्याच्या अनेक पटीने मोजावे लागणारे पैसे आणि जेवणासाठीचे पैसे यामुळे नागरिकही मेटाकुटीला आले आहेत. त्यातच अफगाणिस्थानातील चनलावर आलेल्या मर्यादेमुळे नागरिकांची सर्व बाजूंची कोंडी होत आहे.


हे ही वाचा – Afghanistan crisis: काबुल एअरपोर्टवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता, अमेरिकेने नागरिकांना केले अलर्ट

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -