घरदेश-विदेशअहमदाबाद : आकाशपाळणा कोसळून २ ठार; २६ जण जखमी

अहमदाबाद : आकाशपाळणा कोसळून २ ठार; २६ जण जखमी

Subscribe

गुजरातमधील अहमदाबाद येथे आज मोठ्या आकाशपाळण्याला अपघात झाला असून या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून २६ जण जखमी झाले आहेत.

गुजरातमधील अहमदाबाद येथे आज भीषण अपघात घडला आहे. अहमदाबाद येथील एका अॅडव्हेंचर पार्कमध्ये भीषण अपघात झाला आहे. या पार्कमधील आकाशपाळणा तुटला आणि खाली कोसळला. या अपघातामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून २६ जण जखमी झाले आहेत. या पाळण्यात एकूण ३१ जण बसले होते. त्यापैकी १५ जण गंभीर जखमी असून दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

नेमके काय घडले?

मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबादेतील कांकरिया अॅडव्हेंचर पार्कमध्ये रविवारी ही दुर्घटना घडली आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे की, हा पाळणा सुरु असताना अचानक कोसळला. उचांवरुन कोसळणाऱ्या पाळण्यामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून २६ जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी चौकशी सुरु असून या घटनेचा तपास सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -