घरमुंबईआयुक्त म्हणतात सोशल मिडिया वापरा; मात्र, स्वत:च ‘ट्विटर’पासून चार हात लांब

आयुक्त म्हणतात सोशल मिडिया वापरा; मात्र, स्वत:च ‘ट्विटर’पासून चार हात लांब

Subscribe

मुंबईकरांना विभागांतील समस्या मांडता याव्यात आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण महापालिकेच्या अधिकार्‍यांना करता यावे म्हणून महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी महापालिकेच्या ‘ट्विटर’ खात्याचे नामकरण केले. मात्र, विशेष बाब म्हणजे खुद्द आयुक्तांचे ‘ट्विटर’ अकाऊंट नसल्याचे समोर आले आहे.

मुंबईकरांना विभागांतील समस्या मांडता याव्यात आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण महापालिकेच्या अधिकार्‍यांना करता यावे म्हणून महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी महापालिकेच्या ‘ट्विटर’ खात्याचे नामकरण करतानाच सर्व विभाग कार्यालयांसाठी स्वतंत्र ‘ट्विटर’ खाते निर्माण करण्यास भाग पाडले. त्यानुसार महापालिकेचा कारभार सध्या ‘ट्विटर’द्वारेच चालतो. मात्र, समाज माध्यमाला (सोशल मिडिया) विशेष महत्व देणार्‍या आयुक्तांचे स्वत:चेच ‘ट्विटर’ खाते नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे ‘लोकां सांगे बह्मज्ञान आणि स्वत: कोरडे पाषाण’ अशी प्रविणसिंह परदेशी यांची स्थिती आहे.

म्हणूच आयुक्तच स्वत: ट्विटरवर नाहीत

मुंबई महापालिकेचे आयुक्तपद स्वीकारल्यानंतर प्रविणसिंह परदेशी यांनी समाजमाध्यमाला (सोशल मिडिया) विशेष महत्व देत आहेत. लोकांना थेट तक्रारी मांडता याव्यात आणि महापालिकेच्या विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचावी यासाठी ‘ट्विटर’च्या माध्यमातून एक व्यासपीठ निर्माण करून दिले आहे. ‘एमसीजीएम डिझास्टर’च्या नावाने असलेल्या ‘ट्विटर’ला अपडेट करत महापालिकेने याचे नामकरण ‘माझी मुंबई ,आपली बीएमसी’ असे केले आहे. त्यानंतर सर्व विभाग कार्यालयांचे तसेच खात्यांचे स्वतंत्र ‘ट्विटर’चे खाते बनवून, ते हाताळण्यासाठी महापालिकेच्या २४ विभाग कार्यालयांमध्ये तसेच खात्यांसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे ३२ समन्वयक अधिकारी (नोडल ऑफिसर)नियुक्ती करण्यात आले आहे. मुंबई महापालिका ‘ट्विटर’ला एवढे महत्व देत जनतेच्या थेट संपर्कात राहून काम करत असली तरी आयुक्त मात्र, ‘ट्विटर’च्या संपर्कात नाहीत. त्यामुळे आयुक्तांना स्वत:चे ‘ट्विटर’ खाते उघडायला कुणाची भीती वाटते, असा सवाल उपस्थित होत आहे. ‘ट्विटर’खाते असल्यास आपल्यावर जबाबदारी निश्चित होईल किंबहुना महापालिकेच्या ‘ट्विटर’ ऐवजी नागरिक आपल्याला टॅग करतील याच भीतीने आयुक्त ‘ट्विटर’पासून चार हात लांब राहत असल्याची चर्चा ऐकू येत आहेत.

- Advertisement -

मागील आठवड्यात झालेल्या आढावा बैठकीत आयुक्तांनी महापालिकेच्या मुख्य आणि २४ विभाग कार्यालयांसह खात्यांच्या सर्व ‘ट्विटर’ खात्यांवर नोंदवलेल्या गेलेल्या तक्रारींची माहिती घेतली. यावेळी त्यांन ‘ट्विटर’वर आलेल्या तक्रारींची दखल प्रशासनाने घेतली असली तरी वैयक्तिक संपर्क साधून तक्रारदार नागरिकांचे समाधान झाले किंवा नाही, याचीही माहिती घेतली जावी, असे निर्देश दिले आहे.

उपायुक्त ही ‘ट्विटर’च्या संपर्कात नाहीत

समाज माध्यमाला विशेष महत्व देणारे आयुक्त महापालिकेला लाभले असले तरी त्यांचे अतिरिक्त आयुक्त तसेच उपायुक्त हे ‘ट्विटर’च्या संपर्कात नाहीत. यापूर्वीच्या उपायुक्त (विशेष) निधी चौधरी या ‘ट्विटर’चा अधिक वापर करत महापालिकेने केलेल्या कामांची माहिती जनतेला देत असत. परंतु त्यांच्या या ‘ट्विटर’प्रेमाचा त्रास काही अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना होत असे. परंतु आज निधी चौधरी यांची बदली झाल्यानंतर सोशल माध्यमाला महत्व देणारे आयुक्त लाभल्यामुळे आता निधी चौधरी यांच्याप्रमाणे ‘ट्विटर’चा अधिकाधिक वापर करणार्‍या अधिकार्‍यांची उणिव भासू लागली आहे. त्यामुळे आता आयुक्तांना स्वत:च ‘ट्विटर’ वापर करणे आवश्यक असून खुद्द आयुक्तच आता ‘ट्विटर’पासून दुर पळत असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा – वैतागलेल्या यूजर्सना दिलासा; रात्रभर डाऊन असलेले ट्विटर सुरू


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -