घरदेश-विदेशवायूसेनेच्या मिग- २९ लढाऊ विमानाला अपघात; पंजाबमधील शेतात कोसळले विमान

वायूसेनेच्या मिग- २९ लढाऊ विमानाला अपघात; पंजाबमधील शेतात कोसळले विमान

Subscribe

पंजाबमधील होशियारपूर येथील एका शेतात भारतीय वायूसेनेचे मिग – २९ हे लढाऊ विमान कोसळले असल्याची माहिती समोर येत आहे. नवाशहर जिल्ह्यातील चुहाडपूर येथे शुक्रवारी दुपारी ही दुर्घटना घडली. विमानातील पायलटने प्रसंगावधान दाखवत विमान क्रॅश होण्यापूर्वी त्यातून उडी मारली. त्यामुळे सुदैवाने पायलट या घटनेत बचावला आहे. मात्र पायलट एम. के. पांडेट यांना इजा झालू असून त्यांना उपचारासाठी सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मिग – २९ विमान कोसळ्याची माहिती मिळताच आजूबाजूच्या गावातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जिल्हा आणि पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -